तळोजा नवी मुंबई पनवेल

भिमशक्ती संघटनेच्या मागण्या मान्य,सिडकोने दिले लेखी आश्वासन ,कामाला केली सुरवात.

भिमशक्ती संघटनेच्या मागण्या मान्य,सिडकोने दिले लेखी आश्वासन ,कामाला केली सुरवात. भिमशक्ती संघटनेचे आंदोलन तूर्तास मागे.

सिडको महामंडळाअंतर्गत येणाऱ्या तळोजा फेज – १ / २ मध्ये अनेक बहुमजली इमारती तयार झालेल्या आहेत . सिडकोने नियोजित आराखडा तयार करतेवेळी विविध नागरीक पायाभुत सुविधांसाठी भुखंड आरक्षीत ठेवले आहेत , उदा . गार्डन , पोलिस ठाणे , आरोग्य केंद्र , दफनभुमि , खेळाचे मैदान , समाज मंदिर , हॉर्कस झोन , मार्केट व स्टॉल इत्यादी . परंतु सदरहू राखिव भुखंडाची निर्मिती व सुशोभिकरण सिडको प्रशासना कडून आजतागायत कण्यात आलेली नाही. त्याकरिता भिमशक्ती संघटनेच्या वतीने प्रमुख ११ मागण्यांसाठी १६/१२/२०१९ रोजी आंदोलन करण्याचा इशारा सिडको प्रशासनाला दिला होतो.

सदर होणार असलेल्या आंदोलनाची सिडको कडून दखल घेत सिडको प्रशासनाने भिमशक्ती संघटना यांची सिडको येथील मुख्य अभियंता नवी मुंबई यांच्या दालनात ११/१२/२०१९ रोजी सकाळी ११:३० ला संयुक्त बैठक घेतली होती. त्यावेळी भिमशक्ती संघटना व अनेक समाजसेवक  यांच्या उपस्थितीत असणाऱ्या प्रमुख मागण्या सिडकोचे मुख्य अभियंता (नवी मुंबई ) त्यांच्यासमवेत मांडण्यात आल्या त्या मागण्यांवर मुख्य अभियंता ( नवी मुंबई ).एस के चौटालिया यांनी सविस्तर चर्चा करून उपस्थित केलेल्या प्रमुख मागण्या लवकरात लवकर सोडवण्यात येतील असे लेखी आश्वासन भिमशक्ती संघटनेला दिले आहे,

त्यामुळे होणारे आंदोलन भिमशक्ती संघटनेच्या वतीने मागे घेत आंदोलनाला तूर्तास स्थगिती घेण्यात आली आहे. बैठकीसाठी उपस्थित सिडको मुख्य अभियंता एस के चौटालिया अधीक्षक अभियंता एस जी रोकडे कार्यकारी अभियंता एमडी म्हात्रे भिमशक्ती पनवेल तालुका अध्यक्ष सुभाष गायकवाड , भिम शक्ती तळोजा शहर अध्यक्ष मुन्ना खामकर, रिपब्लिकन सेना जिल्हा अध्यक्ष जीवन गायकवाड, समाजसेवक विनोद गायकवाड , सुनील भोईर, योगेश पगडे , मुश्ताक , संजय सोनवणे , तसेच पत्रकार व अनेक पदाधिकारी व समाज सेवक बैठकी साठी उपस्थित होते.

प्रतिक्रिया

सुभाष गायकवाड ;( भिमशक्ती संघटना पनवेल अध्यक्ष)

सिडकोचे मुख्य अभियंता नवी मुंबई यांच्यासोबत आमची बैठक पार पडली त्या बैठकीत मुख्य अभियंता एस के चौटालिया यांनी तुमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील असे लेखी आश्वासन आम्हाला देण्यात आले .सदर विषयावर येत्या काही दिवसात जॉईन एम डी बरोबर बैठक लावण्यात येणार आहे,त्यामुळे सदर आंदोलन मी मागे घेतले असून सिडकोने आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या कारण सदर आंदोलनाला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे, असे भिमशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी म्हटले आहे.
व तळोजा वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना सुद्धा पत्र देऊन कळविले आहे.

323
Print Friendly, PDF & Email
गोविंद धर्मा जोशी
संपादक : सत्याची वाटचाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *