संपादकीय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानसभेमध्ये शेतकरी कर्जमाफीची मोठी घोषणा!

नागपूर; 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेमध्ये शेतकरी कर्जमाफी संदर्भात मोठी घोषणा केली आहे. सरकारने शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली असून ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे थकीत कर्ज माफ करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगोलियाला 4 हजार कोटी रुपये देऊ शकतात, मग महाराष्ट्रातील शेतकऱ्याला मदत द्यायला काय अडचण आहे, असा सवाल ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हिवाळी अधिवेशनात केला. यावेळी त्यांनी केंद्राने मदत न केल्यास राज्य सरकार स्वतः जबाबादारी घेऊन मदत करेल, असंही सांगितलं.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय सुरु करण्याची घोषणा केली. लोकांना हेलपाटे मारावे लागू नये म्हणून आमचं सरकार प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय सुरु करेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी कर्जमाफीची घोषणा केली असली तरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घोषणेचा निषेध करुन सभात्याग केला आहे. उद्धव ठाकरे सातबारा कोरा करणार म्हणाले होते. मग आता दोन लाखापर्यंत कर्जमाफी का दिली ? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.

नागपूर | ऑनलाइन अर्जाच्या नावाखाली मागील सरकारने शेतकऱ्यांचा जो अपमान केला होता, पती-पत्नीला एकत्रित बोलावून रांगेत उभं करून शेतकऱ्यांना गुन्हेगारासारखी वागणूक देण्याचं पाप केलं होतं. त्यामुळं शेतकऱ्याला सन्मानानं कर्जमाफी दिली जाईल, असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर टीका केली आहे. याबाबत थोरातांनी ट्विट केलं आहे.

352
Print Friendly, PDF & Email
गोविंद धर्मा जोशी
संपादक : सत्याची वाटचाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *