पनवेल राजकीय रायगड संपादकीय

पनवेल महापालिका पोटनिवडणूकीसाठी भाजप विरोधात महाविकास आघाडी येणार आमने सामने.

पनवेल महापालिका पोटनिवडणूकीसाठी रूचिता लोंढेच्या विरोधात महाविकास आघाडी तर्फे शिवसेनेच्या स्वप्नल कुरघोडे यांचा अर्ज दाखल.

पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ मधील पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने आज ,सोमवार दिं .२३ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेच्या स्वप्नल कुरघोडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

दिवंगत भाजप नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होणार असून भाजपच्या वतीने मुग्धा लोंढे यांच्या कन्या रुचिता लोंढे यांनी १६ डिसेंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने माजी नगरसेविका प्रमिला कुरघोडे यांच्या कन्या स्वप्नल कुरघोडे यांनी आपला अर्ज दाखल केला आहे.

अर्ज दाखल करते वेळी पनवेल तालुक्यातील महाविकास आघाडी चे पदाधिकारी मोठी संख्येने उपस्थित होते

शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार बबन दादा पाटील,आमदार बाळाराम पाटील , महापालिका विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल जिल्हाध्यक्ष सतीश पाटील,पनवेल उपजिल्हापुमख रामदास पाटील, शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे, शेकापचे पनवेल जिल्हा चिटणीस गणेश कडू, काँग्रेसचे पनवेल शहराध्यक्ष लतीफ शेख, शिवसेना ग्राहक सं कक्ष उपजिल्हा प्रमुख शशिकांत ढोंगरे, युवासेना जिल्हा नितीन पाटील ,काँग्रेस युवक रायगड जिल्हा अध्यक्ष हेमराज म्हात्रे, शिरीष बुटाला , अच्युत मनोरे , प्रवीण जाधव ,कुणाल कुरघोडे ,यांच्यासह महिला पदाधिकारी प्रतिभा सावंत ,प्रमिला कुरघोडे व विकास महाआघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

561
Print Friendly, PDF & Email
गोविंद धर्मा जोशी
संपादक : सत्याची वाटचाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *