तळोजा पनवेल रायगड संपादकीय

तळोजा मॅन्युफॅक्चर असोशियन तर्फे संक्रांतीच्या दिवशी घेतले रक्तदान शिबीर.

तळोजा मॅन्युफॅक्चर असोशियन च्या मार्फत मकर संक्रांतीच्या दिवशी घेतली रक्तदान शिबीर ,खारघर टाटा हॉस्पिटलमधील रक्ताची कमतरता केली पूर्ण.

तळोजा कारखानदारांकडून रक्तदान शिबिराचे आयोजन,  १३१ रक्तदात्यानी केले रक्तदान

तळोजा / प्रतिनिधी: दी,१५/१/२०२०

रक्तदान हेच श्रेष्ठ दान ’ रक्तदान करा जीवन वाचवा  असा विविध सामाजिक संघटनांतर्फे प्रचार आणि प्रसार करण्यात येत असला तरी रक्तदात्यांची संख्या गेल्या काही वर्षांत कमी झाल्यामुळे रुग्णांना पाहिजे त्या प्रमाणात रक्ताचा पुरवठा केला जाऊ शकत नसल्याची माहिती मिळत आहे.  विविध सामाजिक संस्थांतर्फे रक्तदान शिबिरे आयोजित केली जात असते पण त्यातून पाहिजे त्या प्रमाणात रक्तदान होत नाही.

हा एकच उद्देश समोर ठेवून मकर संक्रांतीच्या दिवशी तळोजा  मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष शेखर श्रुंगारे व टीएमअेच्या पदाधिकारी व सदस्य यांच्या प्रयत्नातून टीएमअे मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते याला कारखाना मालक, अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याने  १३१ रक्तदात्यानी रक्तदान चा हक्क बजावला.व रक्तदात्यांना टीएमअेच्या पदाधिकाऱ्यांकडून भेटवस्तू व सर्टिफिकेट देण्यात आले.

या देशात आवश्यकतेनुसार ४० टक्के रक्ताची कमी होती. रक्त न मिळाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण देशभरात १५ ते २० टक्के आहे. भारतात केवळ ०.६ टक्के लोक रक्तदान करतात. त्या प्रमाणात पुरवठा होत नाही. खाजगी रुग्णालयांमध्ये रक्ताची आवश्यकता असताना त्यांच्याकडे तेवढा साठा उपलब्ध नसल्याचे एका सर्वेक्षणानुसार लक्षात आले आहे. काही खाजगी रक्तपेढींमध्ये जास्तीचे पैसे घेऊन रक्त दिले जात असल्याच्या तक्रारी असल्याचे समजते.

आज आपण कितीही विकसित झालो असलो तरी कोणीही रक्ताच्या कारखान्याची निर्मिती करू शकले नाही. शासकीय पातळीवर रक्तदान संदर्भात जागृती केली जात असली तरी त्या प्रमाणात रक्तदाते मात्र समोर येत नाही. एका व्यक्तीने एकदा रक्त दिल्यानंतर साधारणत तीन महिन्यांनी रक्त देणे आवश्यक आहे. जे नेहमीच रक्तदान करतात त्यांना मधुमेह, हृदयरोग, कॅन्सर आणि रक्तचापसारखे आजार होत नाही, असेही तन्र डाँक्ट रांचे म्हणणे आहे.

रक्त संक्रमण विभाग ( रक्तपेढी ) टाटा मेमोरियल सेंटर , कँसर उपचार अनुसंधान आणि शिक्षाचे प्रगत या डाँक्टरांच्या टीमने खुप मेहनत घेतली.

रक्त तपासणी संदर्भात न्युट्रिक अ‍ॅसिड टेक्नॉलॉजी निर्माण झाली आहे. मात्र, ती केवळ मुंबई आणि दिल्लीत आहे. भारतात २ हजार ७५० रक्तपेढय़ा आहेत, तर महाराष्ट्रात २८२  रक्तपेढय़ा आहेत. या माध्यमातून रक्तपुरवठा रुग्णांना रक्तपुरवठा केला जात असला तरी अजून बरीच आवश्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे,

असे आवाहन तळोजा मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष शेखर श्रुंगारे यांनी केले.

298
Print Friendly, PDF & Email
गोविंद धर्मा जोशी
संपादक : सत्याची वाटचाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *