मुंबई येथील पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या उपसचिव निधी चौधरी यांची बदली रायगडच्या जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. निधी चौधरी या २०१२च्या आयएएस तुकडीच्या अधिकारी आहेत.
रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी यांची नियुक्ती मागील आठवड्यात बुधवारी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी पुणे येथे करण्यात आली होती.
राज्याच्या पाणी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिव निधी चौधरी यांची रायगड जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे . त्यांनी दुपारीच पदभार स्वीकारला तसेच त्यांनी पेण येथे भु – संपादन अधिकारी म्हणून कारकीर्द गाजवली आहे .
भारतीय प्रशासकीय सेवेच्या अधिकारी असलेल्या निधी चौधरी यांनी यापूर्वी मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी जिल्हाधिकारी यांच्यावतीने भूसंपादन अधिकारी म्हणून कारकीर्द गाजवली आहे . त्यानंतर त्यांची बदली मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली होती . सध्या त्या राज्य शासनाच्या पाणी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिव होत्या .
