वांद्रे येथील गर्दी प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुन्हा जनतेसमोर आले होते. त्यावेळी त्यांनी जनतेला लॉकडाऊन पाळण्याचे पुन्हा आवाहन केले आहे. आज त्यांनी पुन्हा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी हा संवाद साधला.
राज्यात काही जिल्हे शुन्य रुग्णांंचे आहेत. राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन असे तीन झोन करण्यात आले आहेत.
ज्या जिल्ह्यात रुग्ण जास्त आहेत व त्यात वाढ होत आहे अशा जिल्ह्यात रेड झोन, तसेच ज्या जिल्ह्यात रुग्ण आहेत व तिथे वाढ होत नाही असे जिल्हे ऑरेंज ,व ज्या जिल्ह्यात अजून एकही रुग्ण नाही असे जिल्हे ग्रीन झोन.
ऑरेंज झोन व ग्रीन झोन मध्ये उद्योग चालू करण्यासाठी परवानगी देत आहोत तसेच काही उद्योग अत्यावश्यक नसल्याने त्यांनी कामगारांची जबाबदारी घेऊन त्यांना कंपनीतच राहण्याची व त्यांच्या आरोग्याची उपायोजना केली तर त्यांनादेखील परवानगी देण्यात येणार आहे.
ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये माफक स्वरुपात उद्योग धंद्यांना परवानगी देण्यात आली आहे.
कोणाला कोरोनाची लक्षण आढळली तर न घाबरता रुग्णालयात या असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
