पनवेल

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांची तपासणी करा पनवेल काँग्रेस कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांची मुख्यमंत्र्यान कडे मागणी

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील घराघरात जाऊन नागरिकांची तपासणी करा पनवेल काँग्रेस कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे मागणी.

पनवेल तालुक्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत दिवसां दिवस वाढ  होत आहे. तसेच कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्या नंतर प्रशासन त्यासाठी सर्व प्रकारची जबाबदारी घेऊन काळजी घेत आहे.

पण यासाठी अजून काही ठोस पाऊले उचलून काही  उपाययोजना करण्यात आल्या तर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पनवेल तालुक्यात कमी होण्यास मदत होईल. त्यासाठी पनवेल काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे काही महत्त्वाची मागणी केली आहे.

केलेली मागणी….                                                 

संपूर्ण पनवेल भागात घरोघरी जाऊन फोर हेड थर्मल चेकिंग मशीन च्या साहाय्याने आपण सर्वांची तपासणी करुन व नागरिकांना काही FLU ( म्हणजेच सर्दी , खोकला , श्वास घ्यायला त्रास होणे ) सारखी लक्षणे आढळल्यास त्यांची पुढे स्वेब टेस्टिंग केल्यास काही कोरोनाचे संशयित रुग्ण सापडण्यास मदत होऊ शकते . अशा रुग्णांमुळे जी साखळी तयार होते तिला तोडण्यास आपल्याला मदत होऊ शकते . म्हणून आपण   रायगड जिल्हाधिकारी महोदया यांना निर्देश देऊन तात्काळ कार्यवाही करण्यास सांगावे . जेणेकरून पुढील पाच दिवसात संपूर्ण पनवेल महापालिका क्षेत्र व तालुक्यात सर्व शासकीय यंत्रणेमार्फत ही मोहीम राबवावी तसेेेच काही स्वयंसेवी संस्थाना सुद्धा आवाहन केल्यास अशा संस्थादेखील मदतीला येऊ शकतात तरी आपण या विषयात लक्ष घालावे. अशी मागणी काँग्रेस पनवेल कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .

127
Print Friendly, PDF & Email
गोविंद धर्मा जोशी
संपादक : सत्याची वाटचाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *