कोरोना विषाणूच्या संकटात देखील तळोजा मॅन्युफॅक्चर्स असोशियन जोपासतोय तळोजा औद्योगिक क्षेत्रातील पर्यावरणाचा समतोल.
तळोजा औद्योगिक क्षेत्र म्हटले की फक्त प्रदूषण करणारे कारखाने व प्रदूषणाचा समतोल न राखणारे व्यवस्थापन असाच मुद्दा आज पर्यंत उपस्थित होत आहे.
पण हेच तळोजा औद्योगिक क्षेत्र मात्र कोरोना विषाणूंच्या संकटात देवरूपी बनले आहे.कारण अनेक अशी औषधे व जंतुनाशक फवारणी मध्ये वापरले जाणारे द्रव्य या कंपन्या बनवत आहेत त्यामुळे कोरोना विषाणूच्या लढाईत तळोजा औद्योगिक क्षेत्राचा मोठा सिंहाचा वाटा ठरणार आहे.
पण हे करत असताना देखील तळोजा औद्योगिक क्षेत्रातून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल यासाठी तलोजा औद्योगिक क्षेत्रातील तलोजा मॅन्युफॅक्चर्स असोशियन विविध उपाय योजना करत पर्यावरणाचा समतोल जपत आहेत.
कारण अनेक दिवसापासून कोरोना संकटात लॉक डाऊन असल्याने तलोजा क्षेत्रातील एमआयडीसी ऑफिस मधील कामकाज देखील बंद आहे.पण तळोजा एमआयडीसीमधील एक काम असे की मार्च-एप्रिल मे महिना आला की औद्योगिक क्षेत्रातील लावण्यात आलेली रस्त्या मधोमध झाडे यांना पाणी देण्याचे काम केले जाते. पण कोरोना संकटात एमआयडीसी मधील ही कामकाज बंद असल्याने रस्त्याच्या मधोमध लावण्यात आलेल्या झाडांना पाणी नसल्याकारणाने झाडे सुकत चालली होती.
मात्र याची दखल घेत तळोजा औद्योगिक क्षेत्रातील असणारे तळोजा मॅन्युफॅक्चर्स असोशियन यांच्या मार्फत पुढाकार घेत या झाडांना पाणी देण्याला सुरुवात केली आहे. त्यामुळे सुकलेल्या झाडांना देखील पालवी फुटायला सुरुवात झाली असून काही झाडांना फुले आली असल्याने रस्त्यात येता-जाताना त्यांचे सौंदर्य पहावयास मिळत आहे.
अशा कार्याचे पर्यावरण प्रेमी कडून तळोजा मॅन्युफॅक्चर्स असोशियनचे कौतुक केले जात आहे
