संपादकीय

ना आमदार ना खासदार ना नगरसेवक पण जपत आहेत सामाजिक बांधिलकी

पनवेल तालुक्यातील नावडे गावातील समाजसेवक ,काँग्रेस पर्यावरण पनवेल शहर अध्यक्ष सुरेश पाटील यांचा पनवेल तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढणार नाही याकरिता निवेदनाद्वारे प्रशासनाला विविध उपायोजना करण्याची मागणी

पनवेल तालुक्यातील नावडे गावातील समाजसेवक सुरेश पाटील यांचा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी कसा करता येईल यासाठी प्रशासनाला विविध उपायोजना करण्याची मागणी केली आहे,त्यामुळे त्यांच्या केलेल्या निवेदनाद्वारे प्रशासनाचे समाजसेवक सुरेश पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

* काय आहेत केलेल्या मागण्या….

पनवेल महानगरपालिका हद्दीतील पोलीस व पोस्ट ऑफिस मध्ये काम करणाऱ्या स्टाफ व कर्मचाऱ्यांची सुरक्षेची जबाबदारी तसेच त्यांना जीवनावश्यक सोय सुविधा मिळण्याबाबत.

तळोजा औद्योगिक विकास क्षेत्रात जंतुनाशक फवारणी करणे बाबत.

तळोजा औद्योगिक विकास क्षेत्रात कोरोना उपचार केंद्र व माहिती कक्ष उपलब्ध करणेबाबत.

पनवेल महानगरपालिके हद्दीतील शहरे उपनगरे वसाहतीत तातडीने जंतुनाशक फवारणी करणेबाबत

तसेच त्यांचे कार्य येथे न थांबता हातावर पोट असणाऱ्या गोर गरिबांना आपल्या स्वखर्चाने अन्नदान वाटप करत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून कोरोना संकटात होत असलेल्या अशा कामाबद्दल नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

118
Print Friendly, PDF & Email
गोविंद धर्मा जोशी
संपादक : सत्याची वाटचाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *