पनवेल रायगड संपादकीय

पनवेल प्रांताधिकारी व तहसीलदार कोरोना विषाणूच्या संकटात रात्र दिवस करत आहेत काम.

पनवेल म्हटले की समाजसेवा करणारा तालुका व अशा तालुक्यात असणारे प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले व तहसीलदार अमित सानप यांनी ही कोरोना विषाणूच्या संकटात आपली काम करण्याची पद्धत लोकांसमोर आणली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भारत देशात व राष्ट्रात वाढणार नाही याकरिता राज्य सरकारने १७ मे पर्यंत लॉक डाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे शहरात व गावात रोजंदारीवर जगणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती, पण यासाठी सरकारदेखील जशी मदत करता येईल तशी मदत करत आहे.

पण म्हणतात ना  गावासाठी सरपंच कार्य करणारा असेल तर गाव कुठल्या गोष्टीत मागे राहत नाही. असेच प्रांताधिकारी व तहसील दार पनवेल तालुक्याला लाभले आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूच्या संकटात हातावर पोट असणारे नागरिक उपवाशी पोटी पनवेल तालुक्यात झोपणार नाही, यासाठी त्यांनी देखील स्वता रात्र दिवस काम करून आपल्या कार्यालतील कर्मचाऱ्यांना जसे काम करता येईल तसे करा असे आदेश दिले आहेत. त्यामुळे पनवेल मधील हातावर पोट असणारे कुटुंब उपवाशी झोपणार नाही याची ते दखल घेतांना दिसुन येत आहेत.

पनवेल तालुक्यातील अनेक अशा गावात व शहरिभागात रोजंदारीवर जगणारे कुटुंब आहेत. अशा गावात व शहरी भागात तीन वेळ चे जेवण पुरवले जात आहे. तलाठी सकाळी 8 वाजता अशी गावे गाठतात व शिजवलेले अन्न हातावर पोट असणाऱ्या घरात जाईल याची काळजी घेतात .आणि त्याचा पूर्ण आढावा दररोज पनवेलचे तहसीलदार अमित सानप प्रांताधिकारी दत्तात्रय नवले घेताना दिसून येत आहेत.

पण ना कुठली प्रसिद्धी ना कुठला गाजावाजा त्यामुळे कोरोना विषाणूच्या संकटात पनवेल चे प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले व तहसीलदार अमित सानप यांचा कोरोना संकटात देत असलेला लढा हा अभिमानास्पद ठरणार आहे.

118
Print Friendly, PDF & Email
गोविंद धर्मा जोशी
संपादक : सत्याची वाटचाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *