खारघर पनवेल संपादकीय

शिवसेना रायगड पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांचा कोरोना संकटात पनवेल मधील गोरगरिबांना मदतीचा हात.

शिवसेना रायगड पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांचा कोरोना संकटात पनवेल मधील गोरगरिबांना मदतीचा हात.

पनवेल तालुक्यातील शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांची काम करण्याची पद्धत व त्यांच्या समाजकार्याचा नेहमीच गुणगान पनवेलच्या जनतेकडून केले जाते आहे.

असेच कार्य या कोरोना विषाणूच्या संकटात शिरीष घरत यांच्या माध्यमातून स्वखर्चाने करण्यात येत आहे. शहरी भागात, गावागावात ,वाड्या वाड्यात ,झोपडपट्टी भागात, जाऊन हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना अन्नधान्य वाटप करतांना ते दिसून येत आहेत.

खारघर येथील आदिवासी पाडे ,बेलपाडा , खारघर शहर ,खांदा कॉलनी ,कामोठा शहर,कळंबोली शहर , पनवेल शहर ,नवीन पनवेल शहर, तळोजा ,पनवेल कोळीवाडा, करंजाडे ,आदिवासी पाडे या ठिकाणी शिरीष घरत यांच्या माध्यमातून अन्न दान वाटप करण्यात आले आहे.

     

*श्री.शिरीष घरत ( शिवसेना रायगड पनवेल जिल्हा प्रमुख )

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे रात्रंदिवस काम करून महाराष्ट्रातुन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी कसा करता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या आदेशाने पनवेल मध्ये जशी आम्हाला मदत करता येईल त्या प्रकारे आम्ही  करत आहोत.
पनवेल तालुक्यातील शहरा शहरात व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी हातावर पोट असणाऱ्यांना कुटुंबाना अन्न धान्य वाटप चालू आहे. पनवेल तालुक्यातील पोलिस नियंत्रण कक्ष यांना फोरर्व्हीलर गाडी ये जा करण्यास अत्यावश्यक सेवा म्हणून दोन महिन्यासाठी देण्यात आली आहे. पनवेल तालुक्यातील सुरक्षा रक्षक यांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सॅनिटरी व मास्क चे वाटप करण्यात आले आहे. तसेच पनवेल मध्ये  अनेक ठिकाणी लॉक डाऊन संपेपर्यंत मोफत शिजवलेले अन्न हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना देण्यात येत आहे.

333
Print Friendly, PDF & Email
गोविंद धर्मा जोशी
संपादक : सत्याची वाटचाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *