पनवेल रायगड संपादकीय

शिवसेना पनवेल विधानसभा तर्फे ५४ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा.

हिंदुह्रदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना संघटनेला आज ५४ वर्ष पूर्ण होत असून या निमित्ताने आज पनवेल विधानसभा मतदार संघात शिवसेना वर्धापनदिन अनोख्या प्रकारे साजरा करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम शिवसेना पनवेलशहर शाखेत करण्यात आला असून या कार्यक्रमाची सुरुवात  छत्रपती शिवाजी महाराज , बाळासाहेब ठाकरे , माँसाहेबा  यांच्या प्रतिमेला पुष्पहार  अर्पण करून करण्यात आली, तसेच भगवे झेंडे फडकवण्यात आले.

त्यावेळी शिवसेना रायगड  जिल्हा प्रमुख सल्लागार बबनदादा पाटील यांच्या वतीने सर्व नागरिकांना मास्कचे वाटप सामाजिक अंतर राखुन करण्यात आले. विशेष  काही बाईक सवार  विना मास्क घालून जात असताना त्यांनी त्यांच्या बाईक अडवून स्वता आपल्या हातांनी  त्यांना मास्क लावले व त्यांना कोरोना संकटात स्वताची व आपल्या परिवाराची काळजी घ्या असे ही सांगण्यात आले.

यावेळी जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, शिरीष बुटाला, महानगरउपसंघटक सुनीत ठक्कर, शहर प्रमुख अच्युत मनोरे, महिला पनवेल शहर संघटक अर्चना कुलकर्णी, पराग मोहिते, प्रवीण जाधव, अनिल कुरघोडे, किरण तावदरे,. राकेश टेमघरे , अनिल टेमघरे, , संकेत बुटाला, देविदास पाटील, विश्वास म्हात्रे, भास्कर पाटील, आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

129
Print Friendly, PDF & Email
गोविंद धर्मा जोशी
संपादक : सत्याची वाटचाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *