खारघर पनवेल

शिवसेना पक्षाच्या ५४ व्या वर्धापन दिनी शेकडो मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश.

शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शेकडो मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश.

शिवसेना पक्षाच्या 54 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी शेकडो मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहिर प्रवेश केला आहे. त्यांचे पक्षात स्वागत शिवसेना पनवेल रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी भगवा ध्वज हाती देऊन केले.

खांदा वसाहतीतील मनसे शहराध्यक्ष संतोष जाधव, शाखाध्यक्ष योगिराज जगताप यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  जाहिर प्रवेश  केला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख शिरीष घरत उपमहानगरप्रमुख दिपक घरत, उपमहानगरप्रमुख लीलाधर भोईर, खांदा वसाहत शहरप्रमुख सदानंद शिर्के, उपशहरप्रमुख दत्तात्रय महामुणकर, विभागप्रमुख जयंत भगत, उपविभागप्रमुख जयराम खैरे, माजी शाखाप्रमुख शिवाजी बेडाम, संजय गमरे, उपशाखाप्रमुख सचिन धोंडे आदी पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत केले.व त्यांना पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया ,

*श्री.शिरीष घरत (पनवेल विधानसभा जिल्हाप्रमुख )                                             शिवसेनेची घोडदौड पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू असून आगामी काळात शिवसेना जबरदस्त ताकदीनिशी पनवेल तालुक्याचा विकास करेल यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध विकास योजना तालुक्यात राबविण्यात येतील. तसेच अनेक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी  मोठ्या प्रमाणात शिवसेनेत प्रवेश  करतील. तसेच मनसे पदाधिकाऱ्यांनी शिवसेना संघटनेवर विश्वास ठेवून मनसे शहराध्यक्ष संतोष जाधव, शाखाध्यक्ष योगिराज जगताप यांच्या नेतृत्वाखाली शेकडोपदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहिर प्रवेश केला आहे.

42
Print Friendly, PDF & Email
गोविंद धर्मा जोशी
संपादक : सत्याची वाटचाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *