तळोजा पनवेल

मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि .कंपनी मार्फत पनवेल भागात हातावर पोट असणाऱ्यांना कुटुंबाना मदत अभियान.

मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि .कंपनी मार्फत पनवेल भागात हातावर पोट असणाऱ्यांना कुटुंबाना मदत अभियान.

सध्या कोरोना विषाणूचा संकट पाहता हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाना सध्या परिस्थितीत कोणाचातरी मदतीचा हात लाभेल अशी या कुटुंबांना अशा आहे. पण असाच मदतीचा हात  तळोजा औद्योगिक क्षेत्रातील असणारे मुंबई वेस्ट मॅनेजमेंट यांच्या पुढाकाराने मिळत असून पनवेल तालुक्यात ठीक ठिकाणी हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे.

राम्की फाउंडेशनच्या मदतीने मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि कंपनी ने ओएनजीसी ऑफिस , पळस्पे , पनवेल जवळील आदिवासी भागातील ३०० घरांना किराणा वस्तूचे तांदूळ , तूर डाळ , हळद , लाल मिरची , मीठ पाकिटे वाटप करण्यात आले आहेत .                                                 तसेच तळोजा फेज १ मधील ही ऑटो रिक्षाचालकांना किराणा मालाची ५० पाकिटे याचे वाटप करण्यात आले आहे.

ही मदत कंपनीच्या सीएसआर मदत अभियानांतर्गत मार्फत करण्यात येत असुम सोमनाथ मल्गार प्रकल्प प्रमुख – मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात येत आहे.
तसेच ही मदती साठी संपूर्ण कार्य सतेज धीवर सीएसआर व्यवस्थापक यांच्या मार्फत केले जात आहे.

41
Print Friendly, PDF & Email
गोविंद धर्मा जोशी
संपादक : सत्याची वाटचाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *