संपादकीय

मुख्यमंत्र्यांचं पंढरीच्या विठ्ठलाला साकडं,आम्हाला चमत्कार दाखव देशाला कोरोना संकटातून बाहेर काढ.

संपूर्ण जगाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढ असं साकडं घालत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात विठ्ठलाची सपत्नीक पूजा केली. यावेळी मुख्यमंत्री, त्यांच्या पत्नी , पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मानाचे वारकरी आणि पुजारी अशा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत ही पूजा पार पडली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना वेक्त करत हा मान मला मिळेल हा मी स्वप्नातदेखील विचार केला नव्हता. मान जरूर मिळाला पण अशा परिस्थितीमध्ये पूजा करावी लागेल हा ही कधी स्वप्नात मी विचार केला नव्हता. मी इथे महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण विश्वाच्या वतीने माऊलीच्या चरणी साकडं घालायला आलो आहे व साकडं घातलं आहे. आज आषाढी आहे, आजपासूनच कोरोनाचे संकट नष्ट होवो आणि संपूर्ण जगाला आनंदी, मोकळं आणि निरोगी जीवन जगण्याचं भाग्य प्राप्त होवो असे मी विठुरायाच्या चरणी साकडं घातलेलं आहे, मातेच्या चरणी साकडं घातलेलं आहे. मी माऊलीला साकडं घातलं आहे की आता आम्हाला चमत्कार बघायचा आहे,कारण मानवाचे कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी पूर्ण देशात प्रयत्न चालू आहेत पण त्यात आता आपल्या चमत्काराची ही आवश्यकता आहे .त्यात हे तोंडाला पट्टी बांधून कसं जीवन जगायच अशा भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या.

तसेच  प्रतिवर्षी आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री सपत्नीक श्री विठ्ठलाची महापूजा करतात. त्यांच्यासोबत राज्यातील एका दाम्पत्यालाही पूजेचा मान दिला जातो. यंदाच्या आषाढी एकादशीला पंढरपुरात होणाऱ्या महापुजेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत पुजेचा मान असणाऱ्या मानाच्या वारकऱ्याची निवड करण्यात आली आहे. विठ्ठल बडे असं त्याचं नाव आहे.

विठ्ठल ज्ञानदेव बडे हे विठ्ठल मंदिरात गेली सहा वर्ष विणेकरी म्हणून सेवा करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात मंदिरात चोवीस तास विणेकरी म्हणून सेवा देणारे बडे या ८४ वर्षाच्या भक्ताला हा मान देण्याचा निर्णय घेतल्याचं मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

विठ्ठल बडे यांचं संपूर्ण कुटंब माळकरी आहे. बडे याचं मुळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर येथे आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आषाढी वारीला वारकरी नाहीत. त्यामुळं दर्शन रांग नाही. म्हणून यंदा मुख्यमंत्र्यांसोबत मानाचा वारकरी कोण ठरणार याबाबत प्रश्न निर्माण झाला होता. यावर तोडगा म्हणून मंदिर समितीनं चिठ्ठी टाकून निवड करावी असी ठरवण्यात आलं. त्यानुसार मंदिरातील सहा विणेकऱ्यांची नावं चिठ्ठीत लिहली गेली. त्यातील एका चिठ्ठीतील विठ्ठल बडे यांना महापूजेचा हा मान मिळाला आहे.

317
Print Friendly, PDF & Email
गोविंद धर्मा जोशी
संपादक : सत्याची वाटचाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *