पनवेल

इंडियाबुल्स covid -19 कोरोना क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णांना योग्य सोयीसुविधा द्या एकनाथ म्हात्रे.

इंडियाबुल्स covid -19 कोरोना क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णांना योग्य सोयीसुविधा द्या पनवेल शिवसेना तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे यांची पनवेल महानगरपालिका आयुक्तांन कडे मागणी.

पनवेल मधील असणारे इंडयाबुल्स कोविड क्वारंटाईन सेंटरमध्ये अनेक दिवसांपासून काहीना काही घडत असल्याने पनवेल महानगरपालिका कुठेतरी कमी पडत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे.

तसेच कोरोना संकटाचा विचार करता पनवेल महानगरपालिकेने covid – 19 रुग्णांच्या उपचार व्यवस्थेसाठी इंडियाबुल्स पनवेल येथ अत्यावश्यक सेवा सुविधा पुरविण्याचे नियोजन केले आहे . पण तेथील अंतर्गत व्यवस्थापन समितीचे मनमानी कारभार व सेवा सुविधांचे अभाव सातत्याने जाणवत आहेत,अशा तक्रारी तेथे दाखल रुग्ण वारंवार आमच्याकडे करत आहेत असे एकनाथ म्हात्रे यांनी सांगितले आहे.

साधारणता सकाळी चहा ची सोय नसून नाश्ता कमी दर्जाचा मिळतो . पिण्यासाठी गरम पाणी उपलब्ध नसते . जेवणात आवश्यक पोषण तत्वाची कमतरता . डॉक्टर नर्स यांची उणीव असून रुग्णांची समाधान कारक चाचणी होत नाही तसेच औषधालयात गैरवर्तण व रुग्णांची कोणतीही चाचणी न करता घरवापसी केली जाते,अशा अनेक तक्रारी शिवसेना तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे यांच्या कडे येत आहेत.

त्यामुळे आज एकनाथ म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे याची संपूर्ण माहिती दिली आहे. तसेच बोलताना अशा असंख्य समस्यांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची अगदी क्षणाचाही विलंब न करता त्यांची आवश्यक ती दखल घ्यावी . अशी जनहितार्थ आग्रही मागणी एकनाथ म्हात्रे यांनी सुधाकर देशमुख यांच्या कडे केली आहे. त्यावेळी उपस्थित होते. कैवारी पाटील ( शिवसेना तलोजा शहर संघटक प्र. १.२.३), गणेश म्हात्रे ( शिवसेना तलोजा विभाग प्रमुख) गुरुनाथ म्हात्रे

461
Print Friendly, PDF & Email
गोविंद धर्मा जोशी
संपादक : सत्याची वाटचाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *