पनवेल संपादकीय

कर्नाटक सरकारचा पनवेल च्या शिवसैनिकांन कडून जोडे मारून केला जाहीर निषेध.

कर्नाटक सरकारचा पनवेल च्या शिवसैनिकांन कडून जोडे मारून केला जाहीर निषेध.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा पुतळा सीमा भागातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातून बेळगाव जिल्हाप्रशासनाने रातोरात हटविला, त्यानंतर पूर्ण देशात व महाराष्ट्रात याचा विरोध होतांना दिसून येत आहे.

असाच निषेध शिवसेनेच्या पनवेल विधानसभा जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या आदेशाने करण्यात आला,कर्नाटक भाजपा सरकार विरोधात घोषणा देऊन तसेच कर्नाटक भाजपा सरकारची प्रतिमा पायदळी तुडवून व जोडे मारून, निषेध व्यक्त केला,

त्यावेळी छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे त्याठिकाणी सन्मानाने पुन्हा बसविण्याची मागणी शिवसैनिकांन कडून केली आहे.
त्यावेळी उपस्थित शिवसेना पनवेल विधानसभा जिल्हाप्रमुख शिरीष घरत ,जिल्हासल्लागार बबन दादा पाटील ,उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील,विधानसभा संघटक दिपक निकम,तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे,पनवेल विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर,उपमहानगर प्रमुख दीपक घरत,लीलाधर भोईर, खांदा कॉलनी शहरप्रमुख सदानंद शिर्के,पनवेल शहरप्रमुख अच्युत मनोरे,शहरसंघटक प्रवीण जाधव,नविन पनवेल शहरप्रमुख रुपेश ठोंबरे,उपशहरप्रमुख अनिल कुरघोडे, राहुल गोगटे, महिला आघाडीच्या प्रमिला कुरघोडे,अर्चना कुळकर्णी, रुही सुर्वे, शुभांगी शेलार, सानिका मोरे, मंदा जंगले, तसेच सेनेचे गणेश म्हात्रे,सूर्यकांत म्हसकर, युवासेनेचे विधानसभा अधिकारी पराग मोहिते,साई पवार, ग्राहक कक्षाचे कुणाल कुरघोडे, निनाद दामले, संकेत बुटाला, विभागप्रमुख सुजन मुसलोंडकर,रवींद्र पडवळ,आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

385
Print Friendly, PDF & Email
गोविंद धर्मा जोशी
संपादक : सत्याची वाटचाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *