पनवेल रायगड संपादकीय

आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य प्रथम वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर.

कोरोना विषाणूचा संकट पाहता राज्यात देशात दवाखान्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे.त्यासाठी आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनानिमित्त दि.११/८/२०२० रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात युवापिढीने रक्तदान करून समाजकार्याचा व माणुसकीचा हेवा वाटेल असे कार्य केले आहे.

संघटनेचे अध्यक्ष रुपेश मच्छिंद्रनाथ धुमाळ व कार्याध्यक्ष गौरव अरुण म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आगरी कोळी कराडी समाजातील रायगड, ठाणे, पालघर मुंबई येथील हजारोच्या संख्येने समाज संघटित होत आहे. तसेच संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तांदानाचा कार्यक्रम झाल्यानंतर संघटनेच्या पद नियुक्ती करण्यात आल्या.

संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त संघटनेच्या उपाध्यक्षपदी रिटघर गावातील माजी सरपंच भारत सुभाष भोपी यांची निवड करण्यात आली. तसेच सचिव पदी जांभूळपाडा गावातील विश्राम मोहिते, खजिनदारपदी धुतुम गावातील नंदेश ठाकूर, सहसचिवपदी वहाल गावातील मंगेश दापोळकर, सहखजिनदार पदी कोंबडभुजे गावातील राहुल कोळी, सहखजिनदार पदी कलंबोली गावातील कुणाल भगत, प्रसिद्धी प्रमुख पदी चिरनेर गावातील करण नारांगिकर, सल्लागारपदी चुनाभट्टी(मुंबई) येथील धीरज कालेकर, कायदेशीर सल्लागार वरचे ओवले गावातील ऍड. वंदन घरत, संघटनेचे प्रवक्ता कोपर गावातील किरण पवार,उद्योजक व रोजगार विभाग अध्यक्षपदी माणघर गावचे रोहन पाटील यांची निवड करण्यात आली. याच बरोबर पनवेल तालुका अध्यक्षपदी युवा शिवव्याख्याते नितळस गावातील विवेक भोपी यांची नियुक्ती करण्यात आली.

तसेच उरण तालुका अध्यक्षपदी वशेणी गावातील विशाल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
पनवेल तालुक्यातील विभाग प्रमुख नेमण्यात आले उलवे नोड अध्यक्षपदी गव्हाण गावातील आकाश कोळी, कर्नाला विभाग अध्यक्षपदी शिरढोन गावातील रोशन पवार, नेरे विभाग अध्यक्षपदी कोप्रोली गावातील प्रदीप पाटील, खारघर विभागा अध्यक्षपदी वहाल गावातील मंगेश म्हात्रे, करंजाडे विभाग अध्यक्षपदी चिंचपाडा गावचे निखिल भोपी, वावंजे विभाग अध्यक्ष खेरणे गावातील प्रमेय फडके, तलोजा विभाग अध्यक्षपदी पडघे गावातील नितीन भोईर, कामोठे शहराध्यक्षपदी कामोठे गावातील वृषभ गोंधली, पनवेल तालुका पत्रकार विभाग अध्यक्षपदी पडघे गावातील गोविंद जोशी, पनवेल तालुका सल्लागारपदी कसळखंड गावचे रवी घरत याच बरोबर उरण तालुका तालुक्यात चिरनेर विभाग अध्यक्षपदी चिरनेर गावातील महेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच जासई विभाग अध्यक्ष पदी दिघोडे गावातील देवेंद्र गोवारी,चाणजे विभाग अध्यक्षपदी मुलेखंड गावचे सुमित थळे , उरण तालुका सल्लागारपदी जसकार गावातील समीर ठाकूर, पनवेल तालुका सल्लागारपदी बामणडोंगरी येथील राजेंद्र म्हात्रे यांची निवड करण्यात आले आहे. तसेच उरण तालुका पत्रकार विभाग अध्यक्ष मोठे भोम येथील संग्राम ठाकूर, उरण तालुका कार्याध्यक्षपदी पिरकोण गावातील चेतन गावंड, यांची निवड व इतर सदस्यांची नोंदणी करण्यात आली.

संघटनेच्या वर्धापन दिनी समाजा सोबतच देशप्रेमाची भावना बाळगत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच समाज प्रेमापोटी समाजातील तरुण अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रात देखील गुणवंत असला पाहिजे यासाठी आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य याच्या अंतर्गत आगरी कोळी कराडी स्पोर्टस् अकॅडमी याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. उरण- पनवेल तालुक्या बरोबरच येणाऱ्या पुढील काळात रायगड, मुंबई ,येथील तालुकाप्रमुख, शहर प्रमुख , विभाग प्रमुख, शाखाप्रमुख या पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात येतील.

आगरी कोळी कराडी समाजातील रायगड ठाणे मधील 95 गावाबरोबरच रायगड ठाणे पालघर मुंबई येथील भूमीपुत्रांच्या पिकत्या जमिनी राहती घरे देशाच्या विकासाच्या नावावर घेऊन या समाजाला १००% भूमिहीन केलं जात आहे.समाजात आपले अस्तित्व टिकून रहावा येथे येणाऱ्या रोजगार, नोकऱ्या, उद्योगधंदे या सर्वांमधे इथल्या भूमीपुत्रांना प्राधान्य मिळावा म्हणून समाजातील तरुण हे आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या एका झेंड्याखाली येऊन मोठ्या प्रमाणात तरूण संघटित होऊन ध्यास समाज्याच्या अस्तित्वाचा हा ब्रीद वाक्य मनाशी बाळगून समाजासाठी काम करत आहेत.अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष रुपेश धुमाळ व कार्याध्यक्ष गौरव म्हात्रे यांनी दिली आहे.

378
Print Friendly, PDF & Email
गोविंद धर्मा जोशी
संपादक : सत्याची वाटचाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *