पनवेल

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये फळवाटप व वृक्षारोपण

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये फळवाटप व वृक्षारोपण

पनवेल /प्रतिनिधी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष हाजी एजाज देशमुख यांच्या आदेशानुसार भाजपा सेवा सप्ताहाचे आयोजन करून संपूर्ण महाराष्ट्रात फळेवाटप, वृक्षरोपण,रक्तदान शिबिरे आदी कार्यक्रम सोशल डिस्टंसिंगचे पालन करून करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा रायगड पनवेलच्यावतीने तालुक्यातील नेरे येथील स्नेहकुंज आधार गृह येथे वृद्धांना फळेवाटप तसेच वृक्षारोपण करून भाजपा सेवा सप्ताह साजरा करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांमध्ये १५ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर पर्यंत सेवा सप्ताह राबविण्याच्या सूचना अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांना मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष हाजी एजाज देशमुख यांनी दिल्या. यावेळी त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण ,रुग्णालये,आश्रम शाळा, वृद्धाश्रम आदी ठिकाणी फळेवाटप, कोरोना योद्धा सत्कार,रक्तदान शिबीर आदी कार्यक्रमांची रूपरेषा अल्पसंख्यांक मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्यावतीने ठरवून देण्यात आली. त्यानुसार पनवेल रायगडमध्ये हा सेवा सप्ताह साजरा करण्यात आला.

यावेळी तालुक्यातील नेरे येथे असणाऱ्या वृद्धांची आपुलकीने विचारपूस करून त्यांना मायेचा आधार देण्याचा प्रयत्न यावेळी अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नवी मुंबई प्रभारी सय्यद अकबर यांनी केले. त्यांनी फळेवाटप केल्यानंतर याच वृद्धाश्रमाच्या आवारात वृक्षारोपण करून पर्यावरणाचे महत्व कायम ठेवले. वृद्धाश्रमातील कार्यक्रम आटोपल्यानंतर टेंभोडे गाव वाघरेची वाडी येथील आदिवासी वाडीवर जाऊन त्यांनी आदिवासी कुटुंबांनाही फळेवाटप करून हा सेवा सप्ताह साजरा केला.यावेळी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे साबीर शेख,जेष्ठ समाजसेवक महेंद्र अण्णा पंडित,स्नेहकुंज आधार गृहचे संस्थापक नितीन जोशी,इम्रान शेख,लाबुद्दीन,राहुल बोर्डे, रवी रत्नपारखी, बंटी रसाळ, सचिन गुप्ता, स्वराज देसाई, विजय पगारे, रुपेश बोर्डे, राहुल शिंदे, मतीन मौलवी, शिरीष गाडेगावकर, रोहित पायगुडे, पप्पू म्हात्रे, मंगेश दाभाडे, राज भोईर, परेश भोईर, राहुल गायकवाड़, कुवर पाटील, रतन जोशी, कुणाल भोईर, रोशन गडगे, वैभव पाटील, विक्रम फुलोरे, रतन कड़ू, रोशन कड़ू आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

58
Print Friendly, PDF & Email
गोविंद धर्मा जोशी
संपादक : सत्याची वाटचाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *