तळोजा औदयोगिक क्षेत्रातील मच्छीच्या कचऱ्या पासून पावडर बनवणाऱ्या कंपन्यांचा धुमाकूळ,निघणाऱ्या दुर्गंधी मुले नागरिकांना श्वास घेण्यास होत आहे त्रास.
सध्या ची परिस्थिती पाहता सर्दी खोकला ताप आला की आपल्याला कोरोना तर झाला नाही ना अशी भीती नागरिकांन मध्ये पसरत आहे. त्यामुळे नागरिक आपली आणि आपल्या कुटुंबाची या सरकारने सांगितलेल्या नियमांप्रमाणे खबरदारी घेत आहेत.
मात्र तळोजा औद्योगिक क्षेत्रामध्ये असलेल्या काही मच्छी कंपन्या मच्छी दुर्गंधीमुळे येथील नागरिकांना लहान मुलांना वृद्धांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे या दुर्गंधीचा परिणाम त्यांच्या आरोग्यास हानिकारक ठरत असून सर्दी खोकला घसा खवखवणे आणि लहान मुलांना या दुर्गंधीमुळे उलटी होणे असा प्रकार घडत आहे.
काही महिन्यापूर्वी या कंपन्या प्रदूषण नियंत्रण मार्फत बंद करण्यात देखील आल्या होत्या पण पुन्हा या कारखान्यांना त्यांच्या अटी शर्तींवर चालू करण्यास प्रदूषण नियंत्रण कडून परवानगी देण्यात आली आहे. पण दिलेल्या अटी शर्ती ह्या मात्र कागदावरच का ? असा सवाल येथील असणारी स्थानिक जनता करत आहे.
आणि ग्रामस्थांन कडून या बाबत फोन केले असता काही प्रदूषण नियंत्रणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आम्ही आपल्याला आमचे नंबर देऊन चुकी केली आहे का आमच्या नातेवाईकांच्या तेरावे आमचे दहावे नाहीत का अशी उत्तरे दिली जातात.
प्रदूषण नियंत्रणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या दुर्गंधी बाबत अनेक तक्रारी जाऊन सुद्धा कारवाई करण्यासाठी का विलंब होत आहे.तसेच अशा कारखान्यांवर रायगड पालकमंत्री आदितीजी तटकरे रायगड जिल्हाधिकारी निधीजी चौधरी यांनीदेखील काही महिन्यापूर्वी या कंपन्या वर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तरीदेखील या कंपन्या कोणत्या अधिकाऱ्यांना जुमानत नाही का असा सवालही आता उपस्थित होत आहे. आणि लोकांच्या जीवाशी खेळण्याची यांना सूट दिले आहे का असा प्रश्न ही आता निर्माण होत असून येथील असणाऱ्या सामान्य जनतेच्या मनात संताप निर्माण होत आहे.
