संपादकीय

पनवेल तहसीलदार अमितजी सानप यांची रायगड जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी पदी नियुक्ती

पनवेल तालुक्यातील तहसीलदार अमितजी सानप यांची रायगडच्या उपजिल्हाधिकारी पदी नियुक्ती.

पनवेल तालुक्यातील तहसीलदार अमितजी सानप यांना त्यांच्या केलेल्या कामाची पोच पावती मिळाली असून त्यांना रायगड जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी पदी बढती मिळाली आहे.

राज्य सरकारने १९ नोव्हेंबर रोजी तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.त्यामध्ये पनवेलचे तहसीलदार अमितजी सानप यांची रायगडचे उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यामुळे त्यांनी केलेल्या कोरोना संकटात गोर गरिबांना मदत, तसेच त्या पाठोपाठ वादळ वारा मध्ये आलेले लोकांवरील संकट,पनवेल तालुक्यातील झालेली पूरपरिस्थिती यांच्याशी सामोरे जाऊन जनतेला त्रास होणार नाही याची पुरे पूर दखल घेतांना ते दिसुन आले होते. या संकटात तहसीलदार अमितजी सानप रात्र दिवस आपल्या कार्यालयात तसेच संकट ठिकाणी स्वता उपस्थीत राहून लोकांना मदत करतांना दिसून आले होते.त्या चांगल्या कार्याचीच व कामाची ही पोच पावती म्हणता येणार आहे.

मा.श्री.अमितजी सानप यांची पनवेलचे तहसीलदार वरून रायगड उपजिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना सत्याची वाटचाल न्यूज कडून खूप खूप शुभेच्छा.


584
Print Friendly, PDF & Email
गोविंद धर्मा जोशी
संपादक : सत्याची वाटचाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *