ती नेमकी कोणती मिसळ पार्टी,मिसळ पार्टीपासून उमेदवार पवन पवार,शहरातील अनेक पत्रकार वंचित,मंग सर्वपक्षीय मिसळ पार्टी कशी म्हणता येईल..
नाशिक शहरातील लवाटे नगर येथील एका हाॅटेलमध्ये रंजन ठाकरे यांनी सर्वपक्षीय आणि पत्रकार यांच्यासाठी मिसळ पार्टी चे आयोजन केले होते,किशोर नामक कथित पत्रकाराला पत्रकारांना निरोप देण्यासाठी सांगण्यात आलं होतं परंतु किशोरने मोजक्याच म्हणजे फेवरच्या पत्रकारांना मिसळ पार्टी साठी बोलावल्याने इतर पत्रकार मात्र मिसळ पार्टीपासून वंचित राहिले,रंजन ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त करत राहिलेल्या पत्रकारांची मनधरणी केली आणि उद्या पुन्हा मिसळ पार्टीचे आयोजन केले आहे.
नाशिक लोकसभा मतदार संघ- 2019 ची निवडणुक प्रकिया समाप्त झाल्यानंतर एकमेकांच्या विरोधात उभे असलेल्या उमेदारांची मिसळ पार्टी रंगली.
दरम्यान असे फोटोही आता सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे.
एकंदरीतच निवडणुकी च्या काळात अपक्ष उमेदवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार यांच्यावर आरोपांची जणु मालिकाच सुरू करून जेल भोगुन आलेले उमेदवार असे वक्तव्य केले करत टीका केली होती.
दरम्यान आता निवडणुक जरी संपली परंतु निकालाची उकळी माञ उद्याप बाकीच आहे. एकमेकांवर घणाघाती शाब्दिक आरोप करणारे हेच ते उमेदवार आहे जे आज मिसळच्या रस्यांवर सोबत ताव मारताना दिसले.
त्यात अनेक विविध पक्षांचे नेते आणि पदाधिकारीही काही मागे नाही.
अनेकांची विशेष उपस्थिती पहावयास मिळाली.
एवढेच नव्हे तर काही राष्ट्रीय पातळीवरील जिल्हा प्रतिनिधीही या मिसळचा मनमुराद आनंद घेतांना दिसले.
असे असले तरी ही मिसळ पार्टी कोणत्या हेतुने आयोजीत करण्यात आली असेल?
यात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा रंगली असेल?
समीर भुजबळ आणि माणिकराव कोकाटे यांच्यात काय चर्चा झाली असेल? आणि पञकारांनाही मिसळ पार्टीसाठी का बोलवले गेले असतील ?
पञकारांनी निवडणुकीचं चांगलं कव्हरेज केल म्हणु न तर मिसळ पार्टी दिलं नसेल ना?
कोकाटे आणि भुजबळ यांच्यात काही साटंलोटं तर नव्हतं ना ?
मिसळ पार्टीचा मुख्य उद्देश काय ?
यावर उमेदवार,पदाधिकारी जनतेसमोर येउन मिसळ पार्टीची माहिती देतील का?
असे नाना प्रश्न सर्वसाधारण नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना भेडसावत आहे.
*सर्व पक्षीय मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले असे असले तरी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांना या पार्टीपासुन का वंचित ठेवण्यात आले* हे न उलगडणारं एक कोडंच म्हणावे लागेल.
*नागरिकांमध्ये चर्चेला उधाण* एकमेकांच्या विरुद्ध लढणारे उमेदवार एकञ येऊन मिसळचा आस्वाद घेत असल्याचे छायाचिञ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले असुन नागरिक आता सभ्रमात आहे.नेमकी ती कोणती मिसळ पार्टी असे नागरिक आणि कार्यकर्ते विचारू लागले आहेत…
*नेते तुपाशी कार्यकर्ते उपाशी अशी परिस्थिती नाशिक लोकसभा मतदारसंघात निर्माण झाली आहे….*
