क्रीडा ताज्या

नाशिककर भारत पन्नू रॅम स्पर्धेसाठी होणार रवाना

 नाशिक शहरात रुजू झाल्यापासून सायकलिंगच्या वेडाने झपाटलेल्या भारतीय लष्कराचे Lt. Col. भारत पन्नू देशातील विविध स्पर्धा गाजवल्यानंतर अमेरिकेतील प्रतिष्ठित रॅम 2019 (रेस अक्रॉस अमेरिका) 11 मे रोजी स्पर्धेसाठी रवाना होत आहेत. जगातील सर्वात अवघड मानली जाणारी ही स्पर्धा येत्या 11 जून पासून सुरू होत असून अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीपासून पश्चिम किनारपट्टीपर्यंतचा 5000 किमीचा प्रवास ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्यासाठी जगभरातून स्पर्धाक सहभागी होत असतात.

नाशिक शहरातून सर्वात आधी 2015 साली डॉ. महाजन बंधूं रिले प्रकारात रॅम स्पर्धा पूर्ण करणारे पाहिले भारतीय ठरले होते. त्यानंतर लष्करातच नाशिकमध्ये रुजू असलेल्या श्रीनिवास गोकुळनाथ यांनी एकट्याने ही स्पर्धा पूर्ण करत नाशिकच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवला होता. आता भारत पन्नू यांनीही ही स्पर्धा पूर्ण करणारच या निश्चयाने सहभागी होत आहेत.

या मोहिमेत Go Green ही संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न होणार असून प्रदूषण कमी होण्यासाठी लोकांनी प्रयत्न करणे जरुरीचे आहे असा संदेश देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे स्पर्धेत सहभागी होऊन भारतात परत आल्यानंतर भारत पन्नू हे वासळी शिवारात स्पर्धेच्या एका किलोमीटरला एक असे 5000 झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यात वड, पिंपळ, निंब आदी देशी झाडांसह इतरही जातींच्या रोपांचा सहभाग असणार आहे.

Lt. Col. भारत पन्नू हे भारतीय आर्मी मध्ये जून 2005 पासून आरोनॉटिकल इंजिनिअर आहेत. ते आर्मीचे हेलिकॉप्टर देखभालीची कामे बघतात. नाशिक कॅम्पसमध्ये सप्टेंबर 2016 पासून रुजू आहेत.

नाशिकचे वातावरण कोणत्याही खेळासाठी पूरक असून नाशिक सायकलीस्ट्सच्या खंबीर पाठिंब्यामुळे सायकलिंगला खेळ म्हणून गंभीरपणे घेताना देशांतर्गत व देशाबाहेरील स्पर्धा गाजवता आल्याचे भारत पन्नू अभिमानाने सांगतात.

नाशिक सायकलिस्ट सोबत छोट्या राईड्स पासून सुरू झालेला हा प्रवास सुरुवातीला सुपर रँडोनर किताब मिळवण्याचे लक्ष पूर्ण केल्यानंतर केवळ 2 वर्षात आता रॅम स्पर्धेत उतरण्याइतपत शक्य झाला आहे.

जगभरात ऑडेक्स या संस्थेमार्फत होणाऱ्या 200 पासून 1200 किमीपर्यंतच्या राईड्स पूर्ण केल्यानंतर मिळणारा सुपर रँडोनर किताब केवळ 5 महिन्यात दोन वेळा मिळवता आला.

पुढे मित्र दर्शन दुबे यांच्या सांगण्यावरून इंस्पायर इंडिया यांच्यामार्फत 500 किमीची अल्ट्रा स्पाईस रेसमध्ये सहभागी होण्याचा विचार करताना मी रॅम क्वालिफायर असणाऱ्या 1000 किमीची स्पर्धा जानेवारी 2017 मध्ये पूर्ण केली. यात स्क्वाड्रन लीडर संतोष दुबे यांचाही पाठिंबा मिळाला.

नोव्हेंबर 2018 मध्ये डेक्कन क्लिफहँगर (पुणे ते गोवा) ही 646 किमीची स्पर्धा 26 तास 6 मिनिटात पूर्ण वेळेत पूर्ण करून त्यानंतर ले. कर्नल भारत पन्नू गोवा-उटी-गोवा ही अल्ट्रा स्पाईस सायकलिंग स्पर्धा सर्वाधिक वेगवान गतीने पूर्ण करणारे सायकलपटू ठरले. 26 जानेवारी 2019 रोजी गोव्यातून सुरू झालेली ही 1750 किमीची स्पर्धा पन्नू यांनी 95 तासात पूर्ण करत नाशिकचेच कर्नल श्रीनिवास गोकुलनाथ यांचा विक्रम मोडला.

अशा स्पर्धा पूर्ण करण्यासाठी प्रचंड मानसिक तयारी करावी लागते. प्रत्येकात ही क्षमता असून आपापल्या परीने प्रत्येकाने ती अजमावली पाहिजे असे पन्नू यांनी यावेळी सांगितले.

अल्ट्रा स्पाईस रेस जिंकल्याचा आनंद साजरा करताना पुढे अजून काही करावं म्हणून ऑगस्ट 2017 मध्ये RAA म्हणजेच रेस अराउंड ऑस्ट्रिया या स्पर्धेत दर्शन दुबे यांच्यासह सहभागी झालो. 2200 किमीची ही स्पर्धा पूर्ण करणारे आम्ही पाहिले भारतीय ठरलो. यात दिव्या ताटे आणि प्रशिक्षक चैतन्य वेल्हाळ यांचे मार्गदर्शन यावेळी लाभले.

कोणतीही अल्ट्रा सायकलिंग रेस पूर्ण करण्यासाठी विविध पैलू जबाबदार असतात. आपले लक्ष्य, फिटनेस, समंजस क्रू सदस्य, रोजचे प्रशिक्षण आणि सराव तसेच आपले डावपेच आणि धोरण या गोष्टींचा मिलाफ झाल्याशिवाय यात यश मिळत नाही असे भारत पन्नू यांनी सांगितले. रॅम 2018 मध्ये क्रू म्हणून सहभागी झालो असताना अशा अनेक गोष्टींवर उपाय शोधले सापडले आणि अजून जोमाने या 2019च्या स्पर्धेच्या तयारीला लागलो. माझ्या डाव्या गुडघ्यात झालेली दुखपत क्लीट्स वापरून सवयीत बदलून घेतली. भौतिक चिकित्सा (physiotherapy) च्या विविध वर्ग पूर्ण लरून फिटनेस राखण्यात मदत झाली आहे.

रॅम 2019 साठी अमेरिकेचे ट्रेसी मकाय यांच्या प्रशिक्षणाखाली तयारी करत असून तेच क्रू टीमचे प्रमुख असणार आहेत. क्रू टीममध्ये नीता नारंग, प्रमोद तुपे, दर्शन दुबे, अजय खालडे, नवीन त्रिपाठी, हिमांशू ठुसे, आरती नांगरणी, वामसी, राघव तसेच जेम्स फॉल्सम, लॅरी पहामन या अमेरिकन सदस्यांचा सहभाग आहे.

असा सुरू आहे भारत पन्नू यांचा अल्ट्रा सायकलिंगचा प्रवास…

• जून 2015 पासून सायकलिंग सुरू
• नाशिक सायकलिस्टच्या विविध राईड्स मध्ये सहभाग
• नाशिक सायकलीस्ट्सच्या एनआरएम उपक्रमातील राईड्समध्ये सहभाग
• पुढील दोन वर्षात ऑडेक्स राईड मधून 2 वेळा सुपर रँडोनरचा किताब जिंकण्यात यश
• जानेवारी 2017 मध्ये 1000 किमीची अल्ट्रा स्पाईस रेस जिंकत रॅम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्रता मिळवली
• ऑगस्ट 2017 मध्ये दर्शन दुबे यांच्यासोबत RAA रेस अराउंड ऑस्ट्रिया पूर्ण
• जानेवारी 2018 मध्ये अल्ट्रा स्पाईस रेस तिसऱ्या क्रमांकावर राहत पूर्ण.
• नोव्हेंबर 2018 मध्ये डेक्कन क्लिफहँगर (पुणे ते गोवा) ही 646 किमीची स्पर्धा 26 तास 6 मिनिटात पूर्ण वेळेत पूर्ण.
• जानेवारी 2019 मध्ये गोवा उटी गोवा ही 1700 किमीची अल्ट्रा स्पाईस रेस विक्रमी वेळेत पूर्ण. यात श्रीनिवास गोकुळनाथ यांचा विक्रम मोडीत.
• आता रॅम 2019 स्पर्धेची होणार सहभागी…

रॅम स्पर्धेतील आर्मी कप आहे मुख्य लक्ष्य

रॅम स्पर्धेत जगभरातील विविध देशांच्या लष्करातील सैनिक मोठ्याप्रमाणात स्पर्धेत सहभागी होत असतात. या स्पर्धकांची वेगळा गट असतो. या गटात सर्वात कमी वेळेत स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्पर्धकाला आर्मी कप या सन्मानाने गौरविले जाते. हा कप भारतात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पन्नू यांनी यावेळी सांगितले.

पन्नू यांना थेट मदत करून आपण त्यांच्या या मोहिमेला मदत करू शकता. आर्मी कप मिळविणे हे भारत पंनू यांचे मुख्य लक्ष्य असून या मोहिमेसाठी एकूण 45 लाखांचा खर्च आहे. यातील 25 लाख रुपये भारत पन्नू हे स्वखर्च करत आहेत. उर्वरित 20 लाख रुपये स्पॉन्सरशीप आणि लोकसहभागातून निधी उभारण्याचा प्रयत्न होत आहे. आजपर्यंत 40% पैसे उभे करण्यात यश मिळाले असून अजून लोकांनी सढळ हाताने मदत करून देशाचे नाव उज्वल करण्यासाठी आवाहन पन्नू यांनी केले आहे,।

पन्नू यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी www.bharatpannu.com या संकेतस्थळाला भेट द्या. थेट मदतीसाठी आपण https://www.ketto.org/fundraiser/bharat_pannu येथे जाऊन मदत करू शकता.
तसेच खाली दिलेल्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करू शकता.
BHARAT KUMAR
IFSC Code : UTIB0000204
Account No. 913010016973185

PayTM (9596800477)

UPI – bharatpannu@axisbank

आजवर रॅम स्पर्धेत नाशिक :

रॅम या अत्यंत अवघड मानल्या जाणाऱ्या सायकलिंग स्पर्धेत महाराष्ट्रातील सायकलीस्टने विजयी पताका लावल्या आहेत. नाशिकच्या टीम सह्याद्रीने केवळ ८ दिवस १० तास आणि १६ मिनिटात ही रेस पूर्ण केली आहे. सांघिक गटात (टीम ऑफ ४) मध्ये नाशिकच्या डॉ. राजेंद्र नेहेते (५०) , डॉ. रमाकांत पाटील (५३), युरोप मध्ये काम करत असलेले नाशिककर डॉ. संदीप शेवाळे (४६) आणि मुंबईचे पंकज मार्लेशा (३६) यांचा समावेश असलेली टीमने नवव्या क्रमांकावर रॅम रेस पूर्ण केली.

तत्पूर्वी नाशिकचे कर्नल डॉ. श्रीनिवास गोकुळनाथ यांनी वैयक्तिक (सोलो) गटात काल ११ दिवस १८ तास ४५ मिनिटात ही रेस पूर्ण केली आहे. ते आपल्या गटात सातव्या क्रमांकावर राहिले. तर नागपूरचे अमित समर्थ (सोलो गटात) यांनी ११ दिवस १८ तास ११ मिनिटात रेस पूर्ण केली. ते नवव्या क्रमांकावर राहिले.

२०१५ सालच्या रॅम स्पर्धेच्या पर्वात डॉ. महाजन बंधूनी यश मिळवल्यानंतर भारतातील खास करून महाराष्ट्रातील आणि त्यात नाशिकच्या सायकलीस्ट मध्ये वेगळाच हुरूप आलेला दिसून येत आहे. रॅम २०१७ च्या पर्वात भारताला अभूतपूर्व यश मिळवून देण्यात नाशिकच्या सायकलीस्टचा मोठा वाट दिसून येत आहेत. रॅम २०१७ मधेय यश मिळवलेले सर्व ८ सायकलीस्ट महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. आणि विशेष म्हणजे या ८ पैकी ७ सायकलपटू हे डॉक्टर आहेत.

२०१५ साली डॉ. महाजन बंधूनी टीम ऑफ २ गटात रॅम स्पर्धा केवळ ८ दिवस १४ तास ५५ मिनिटात स्पर्धा पूर्ण करत रॅम स्पर्धा पूर्ण करणारे पहिले भारतीय ठरले होते. त्यांना सायकलिंगमध्ये यश मिळविण्यास नाशिक सायकलीस्ट फाउंडेशनचे महत्वाचे सहकार्य मिळाले आहे.

यावेळी नाशिकचे क्रीडा अधिकारी रवी नाईक, नाशिक सायकलीस्ट्सचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया उपस्थित होते.

254
Print Friendly, PDF & Email
गोविंद धर्मा जोशी
संपादक : सत्याची वाटचाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *