राजकीय

श्रीरंग आप्पा बारणे देशभरात चर्चेत चतुर राजकारणी कुटुंबाला पराभवाचा धक्का.

महाराष्ट्रातील दिग्गज राजकारणी असलेल्या पवार कुटुंबातील उमेदवार असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मावळ मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे मोठ्या मताधिक्याने निवडून आले असून पवार कुटुंबातील उमेदवार पार्थ पवार यांचा पराभव केल्याने बारणे पवारांना भारी ठरले आहेत.

तर बारणे यांच्या विजयाने मावळवर तिसऱ्यांदा शिवसेनेचा भगवा फडकला आहे.तसेच श्री रंग आप्पा बारणे सलग दुसऱ्या वेळेस निवडून आले आहेत. झालेल्या १३ लाख ६६ हजार ८१८ मतदानापैकी श्रीरंग बारणे यांना ७ लाख २० हजार ६६३ तर पार्थ पवार यांना ५ लाख ४ हजार ७५० मते पडली आहेत.  राजाराम पाटील यांना (वंचित बहुजन आघाडी) जवळपास ७७ हजार मते पडली आहेत.

मावळमधून २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मावळ लोकसभा मतदारसंघात २२ लाख ९७ हजार ४०५ मतदारापैकी १३ लाख ६६ हजार ८१८ मतदारांनी २ हजार ५०४ केंद्रावरांवर मतदानाचा हक्क बजाविला होता. बालेवाडीतील क्रीडासंकुलात सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली असता पहिल्या फेरीपासून शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी आघाडी कायम ठेवली. साडे अकरा वाजेपर्यंत बारणे यांनी एक लाखाचे लीड पार केले होते. दुपारीच बारणे यांनी विजयाच्या दिशेने कूच केली.

देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा बारणे यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केल्याने बारणे देशभरात चर्चेत आले आहेत.

शरद पवार यांचे नातू मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याने महाराष्ट्रासह देशभरातील नेत्यांचे या मतदारसंघाकडे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी पक्षाची राज्यातील ज्येष्ठ नेत्यांची फौज मावळ लोकसभा मतदारसंघात तळ ठोकून होती. परंतु त्या फौजेविरोधात संयमीपणे बारणे यांनी खिंड लढवून मावळच्या गडावर भगवा कायम ठेवला.

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जात होता. अजितदादा सलग दहा वर्ष पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. पिंपरी महापालिकेवर १५ वर्ष त्यांनी राज्य केले. मावळ लोकसभा मतदारसंघातून मुलगा पार्थ याचा पराभव झाल्याने अजितदादांना मोठा धक्का बसला आहे.

अजित पवारांना धक्का!

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जात होता. अजितदादा सलग दहा वर्ष पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. पिंपरी महापालिकेवर १५ वर्ष त्यांनी राज्य केले. मावळ लोकसभा मतदारसंघातून मुलगा पार्थ याचा पराभव झाल्याने अजितदादांना मोठा धक्का बसला आहे.

 

*बबनदादा पाटील ;( रायगड जिल्हा सल्लागार)

 मावळ लोकसभा मतदारसंघातील  शिवसेना,भाजप,आरपीआय युतीचे कार्यकर्ते पदाधिकारी व शिवसैनिक यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन खासदार श्रीरंग आप्पा बारणे  यांना दुसऱ्यांदा लोकसभेत पाठवले. त्यामुळे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचे अभिनंदन व  रात्र दिवस काम करणारे युतीचे कार्यकर्ते व शिवसेनेचे शिवसैनिक यांचे मनापासून आभार व अभिनंदन.

                 हा विजय हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा आहे.

123
Print Friendly, PDF & Email
गोविंद धर्मा जोशी
संपादक : सत्याची वाटचाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *