पनवेल संपादकीय

पनवेल मध्ये रस्त्यावर भिक मागणाऱ्या व काम करणाऱ्या लहान मुलांचा विचार करणार कोन , का पाहून केले जाते दुर्लक्ष.

,,पनवेल मधील महानगरपालिका क्षेत्रात मध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर भीक मागताना, महिला लहान मुलांना कडेवर घेऊन दिसतात,,,कडक उन्हाचे चटके लागत असताना.                                                                                     पण ते चटके लहान मुलांना किती त्रास देत असतील हा अंदाज आपण कधी केला आहे का?
या उन्हाच्या चटक्या मुळे ती लहान मुले किती तडपडत असतील हा विचार कधी केला आहे का?

पोट भरता येत नसेल तर, का जन्म देता असे कोण्ही विचारले आहे का?

पण त्या मुलांना तरी काय माहित भीक म्हणजे काय?

ज्या हातत पेन वही पाहिजे त्या हातात आपण पैसे देतो पण ते पैसे तरी त्यांचे पोट भरते का?

पण अशा कृत्या मुळे किती लहान मुलांचे जीव देखील जातात पण यांना याची पर्वा असते का?

व ते मूळ का चोरून आणले नसावे हा विचार कधी कोण करतो का?

सिग्नल लागला की गाडी पुढे धावणारी लहान मुले शिक्षण घेण्याच्या वयात हातात हार , मोबाईल कव्हर , बिसलेरी , गाडी पुसण्याचे कपडे, नाहीतर भीक मागताना दिसत असतात.
मग बाल कामगार गुन्हा असताना अशा लहान मुलांकडून काम करून घेणाऱ्यांवर का कारवाई होत नाही हा ही मुद्दा आहे.

समोर पोलीस चौकी असतांना व तेथे पोलीस उभे असताना अशा लहान मुलांचा सहारा घेत भीक मागितली जाते मग त्यावर पोलीस मित्रांचा लक्ष का नाही ?

वृद्धांना वृद्धाश्रम आहेत.

लहान मुलांना अनाथ आश्रम आहेत.

मग तरीही मुलांन कडून व वृद्धीमहिला व महिला कडून भिक का मागितली जाते याची सखोल चौकशी पनवेल महानगरपालिका आयुक्तांनी करून लहान मुलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लवकरच ठाम पाऊल उचलावा.

कारण पनवेलचा मध्ये राहणारा नागरिक हा कष्टाळू व काम करणारा आहे अहोरात्र मेहनत करून मुलांना चांगले शिक्षण देतोच व पोट देखील भरतो मग भीक मागणारी व शिक्षण करण्याच्या वयात रस्त्यावर गाडीच्या मागे पुढे धावणारी मुले कुठली व कोणाची त्या मुळे काय घडण्या आगोदरच पनवेल महानगर पालिका ने काही ठाम पाऊल उचलावे असे पनवेलकर म्हणत आहेत.

170
Print Friendly, PDF & Email
गोविंद धर्मा जोशी
संपादक : सत्याची वाटचाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *