उरण पनवेल मुंबई

वाढदिवसाच्या दिवशी ही लोकांच्या सेवे साठी,स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे नेते राजाराम पाटील

वाढदिवस म्हटले की आपण काहीतरी विशेष करत असतो ,,एकतर देवदर्शन ,,कुटुंबा सोबत एन्जॉय,,किंवा मित्रमंडळींच्या शुभेच्छा स्विकार करण्यासाठी होपीस मध्ये राहणे,मित्रानं सोबत पार्टी करणे,,

पण
आगरी, कोळी, कराडी तसेच समस्त ओ बी सी समाजासाठी सर्वस्व पणाला लावणारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामधे भुमिपुत्राना न्याय मिळवण्यासाठी सतत धावपळ करणारे, मुंबई तसेच नवी मुंबई मधील गावठाणे वाचवण्यासाठी गेली अनेक वर्षांपासून संघर्स करणारे, समाजकार्यात तरुण पिढीला मार्गदर्शन करणारे व गावठाण विस्तार योजना गावोगावी पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम घेणारे,,शेतकरी प्रकल्पग्रस्तांचे नेते राजाराम पाटील वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा शेतकऱ्यांच्या साठी भर पावसात  विमानतळ भागातील गावात जाऊन सहकार्य करतांना दिसून आले आहेत. निवडणूक मध्ये अपयश आले असले तरी जनतेसाठी रस्त्यावर उतरून राजाराम पाटील हे प्रकल्पग्रस्त शेतकरी व सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी समाजसेवा से चांगले उत्तम काम करत असताना दिसून येत आहेत.

नाहीतर काही नेते फक्त जसे पाऊस आला की बेडके बाहेर येतात, तसे निवडणूक आली की बाहेर येतात.

राजाराम पाटील (प्रकल्पग्रस्त नेते)

नवी मुंबई विमानतळाचे नियोजन फसले,नव्या नदीचे पात्र पाणी अडवून बसले,डुनगी ता पनवेल गावात पाणी घुसले,

विमानतळ मोठ्या पावसाने अडचणीत येण्याची भीती,व केलेल्या भरवामुळे समोरील गावांना बुडवण्याचा विचार सरकारने केला आहे असे वाटत आहे.
सदर भराव हा निसर्गविरोधी नियोजन असे ठरत आहे. हे सद्या तरी सरकार च्या लक्षात येईल असे वाटत आहे. व त्यावर काय उपाय योजना सरकार करणार आहे की सामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागणार आहे..व जीव गेला की ३ लाख ५ लाख मदत करू अशी सरकारने भूमिका घेतली आहे का ?

66
Print Friendly, PDF & Email
गोविंद धर्मा जोशी
संपादक : सत्याची वाटचाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *