उरण नवी मुंबई पनवेल संपादकीय

का बुडतय नवी मुंबई ,कोण बुडवतोय नवी मुंबई जाणून घ्या सत्य घटना येथील आगरी कोळी बांधवांन कडून.

नवी मुंबई पनवेल म्हटले की वाद विवाद हा वाद ना मिटला ना मिटणारा ,तसाच आज पुन्हा पाहायला मिळाला आहे,,,,कारण काल दोन तास मुसळधार पाऊस पडला व नवी मुंबई पनवेल मधील घरे रस्ते दवाखाने बुडाली,,

याचे अनेकांनी अनेक कारण सांगितले की पांडव गडा चे बांध फुटल्याने पाणी आले व ही परिस्थिती झाली पण खरच तसे आहे का ? त्या मुळे अशी परिस्तिथी निर्माण झाली का ? मग ऐवडी वर्ष तसे झाले होते का?

स्थानिक आगरी कोळी,,
मुंबई ही समुद्र नद्या डोंगर शेती यामध्ये वसलेली आहे. त्यामुळे समुद्राचे पाणी भरतीच्या वेळी विरुद्ध दिशेने शेतात नद्यात जात असते व डोंगर भागात शेतात गावात पडणाऱ्या पावसाचे पाणी खालच्या दिशेने समुद्राकडे वाहत असते .
पण जेव्हा समुद्राला भरती आलेली नसते तेव्हा डोंगर भागातून नद्यांतून येणारा पाणी हा समुद्र आपल्या कुशीत घेत असतो,
पण जेव्हा समुद्राला भरती आली असेल व डोंगर भागातून नद्यातून तेवढ्याच प्रमाणात पाणी येत असेल तर ते समुद्र आपल्या कुशीत घेत नाही. त्यामुळे त्या पाण्याला जिथे जागा मिळेल तेथे तो घुसण्याचा प्रयत्न करतो. त्या मुळेच सद्या आपली घरे व रस्ते  बुडत आहेत.

कारण अनेक वर्षांपूर्वी पनवेल नवी मुंबई मध्ये खाडी शेती मोठी पटांगणे होती त्यामुळे समुद्राची भरती आल्यानंतर डोंगर भागातून येणारे पाणी हे या खाडी शेतित तुंबून राहायचे.

भरावा पूर्वी भरती आलेले पाणी खाडी शेती

 

पण आत्ता मोठ्या प्रमाणात विमानतळासाठी त्याच खाडी शेती मध्ये भराव केल्याने शेताच्या वर असणारी घरे रस्ते ही शेतीच्या ऊंची पेक्षा खाली गेली आहेत.

खाडी शेती भराव विमानतळ नवी मुंबई


त्यामुळे जे पाणी घरखाली असणारी शेती मध्ये
तुंबून राहायचे त्यावर मोठया प्रमाणात भराव केल्याने ते एकतर समोरील असणाऱ्या गावातील घरात जात आहे किंवा रस्त्यावर.  त्या मुळे दरवर्षीप्रमाणे हीच परिस्थिती येथील नागरिकांना सहन करावी लागणार आहे.

खाडी शेती मधील स्थानिक गावकरी

*किरण पवार .समाजसेवक.(कोपर कोल्ही )

देशाचा विकासासाठी मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे येथील शेतकऱ्यांची आपल्या वाडवडिलांनी जपून ठेवलेल्या जमीनी कवडीमोल भावाने शासनाने संपादित केल्या. पण देशाचा विकास होत असताना इथला भूमिपुत्र मात्र जगण्यासाठी संघर्ष करत आहे. देशाचा विकास करत असताना सरकारने , वृक्षतोड, शेकडो एकराची डोंगर फोडून नदीचे पात्र बदलणे, गावच्या गावे स्थलांतर करून सिमेंटची जंगल तयार करून पर्यावरणाचा मोठा नुकसान केला आहे. त्यामुळे येथे जमिनीमधे पाणी मुरण्यासाठि जागाच उरली नाही परिणामी इथे पडलेला पाऊस लोकांच्या घरात घुसून जीवितहानी आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहेत. त्यामुळे इथला भूमिपुत्र जीव मुठीत घेऊन जिवन जगत आहे.

*रुपेश धुमाळ. समाजसेवक(कोपर कोल्ही गावकरी)

दोन तासात नवी मुंबई बुडायचे कारण म्हणजे सिडको आणि तेवढेच जबाबदार स्थाणिक नेते जर कारण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे जेथे भराव केले आहे तेथील ८५० हेक्टर मधील कांदलवने ज्याला आपण पर्यावरणाचा ह्रृदय म्हणतो ज्या झाडात पुराला नियंत्रित ठेवण्याची ताकद असते तेवढि कांदलवणे नष्ट केल्यामुळे आज ही परिस्थिती आहे आणि स्वताला शहराचे शिल्पकार म्हणणाऱ्या सिडको प्लॅनिंग अॅथाॅरिटि मध्ये सर्व कलाकार भरलेत आणि या गोष्टी साठी आपले आमदार आणि खासदार ही तेवढेच भागीदार आहेत. यांनी जर खरच जनतेच्या भविष्याचे विचार केला, समाजाच्या होणाऱ्या सुखसुविधाकडे जाणीव पुर्वक लक्ष दिले, तर या गोष्टी सुध्दा थांबवता येतील.

याचं एक आताचच उदा॰ म्हणजे मागच्या वर्षी सुध्दा डुंगी गाव बुडाल होत पण आमचे उरण व पनवेलचे स्थाणिक आमदार विमानतळाच्या भरावाच्या कामात व्यस्त होते त्यामुळे याही वर्षी डुंगी ग्रामस्थांच्या घरात पाणी गेल्यानंतर येथील प्रांत ,तहसीलदार , सिडको व स्थाणिक नेत्यांना जाग आली . या साठी हेच जबाबदार आहेत. असे माझे वयाक्तिक मत आहे.

स्थानिक नेत्यांनी निवडून दिलेल्या खासदार आमदार नगरसेवक यांनी या गोष्टी कडे लक्ष देऊन योग्य विचार करावा ,,,विमान उडण्या पेक्षा घरे कशी बुडणार नाही या कडे जास्त लक्ष द्यायला हवा.महानगरपालिका चे अधिकारी व कामगार किती पाणी काढणार निसर्गाच्या विपरीत काही करू नका नाहीतर एक दिवशी पनवेल नवी मुंबई उरण हे सहज पाण्याखाली जाईल.

253
Print Friendly, PDF & Email
गोविंद धर्मा जोशी
संपादक : सत्याची वाटचाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *