हिमा दासची ‘सुवर्ण’पंच! १९ दिवसात पटकावले पाचवे सुवर्णपदक
शनिवारी झेक प्रजासत्ताकमधील नोवे मेस्टोनाड मेटुजी ग्रां.प्री. स्पर्धेत हिमाने महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत अव्वलस्थान पटकावत सुवर्णपदकावर नाव कोरले. हे हिमा दास हिचे गेल्या १९ दिवसातील पाचवे सुवर्णपदक ठरले आहे.
हिमा हिने ट्विटरवर एक फोटो शेअर करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. झेक प्रजासत्ताक येथे 400 मीटर शर्यत अव्वलस्थानी राहत पूर्ण केली. हिमा हिने 52.09 सेकंद वेळेत शर्यत पूर्ण केली. याआधी झेक प्रजासत्ताक येथे झालेल्या टबोर अॅथलेटिक्स मीट स्पर्धेत हिमाने २०० मीटर शर्यतीत सुवर्ण कामगिरी केली. २३.२५ सेकंदाची वेळ देत तिने शानदार बाजी मारली होती.
हिमाची सुवर्ण कामगिरी
2 जुलैला पोजनान अॅथलेटिक्स
ग्रां. प्री. स्पर्धेत 200 मी. 23.65 सेकंदासह शर्यतीत सुवर्ण.
7 जुलैला कुटनो अॅथलेटिक्स
मीट स्पर्धेत २०० मीटर शर्यतीत 23.97 सेकंदासह सुवर्ण.
13 जुलै झेक प्रजासत्ताक
येथे क्लांदो अॅथलेटिक्स 200 मीटर शर्यतीत 23.43 सेकंदासह सुवर्ण.
18 जुलै, झेक प्रजासत्ताक
टबोर अॅथलेटिक्स मीट, २०० मीटर शर्यतीत २३.२५ सेकंदांसह सुवर्ण.
20 जुलै झेक प्रजासत्ताक
नोवे मेस्टोनाड मेटुजी ग्रां.प्री. 400 मीटर शर्यतीत 52.09 सेकंदांसह सुवर्णपदक.
हिमादास ची अभिमानस्पद कामगिरी
घर पाण्यात तरी, देशासाठी धावत राहिली हिमा आसामची असणारी हिमा दास हिचे घर पुरामध्ये वाहून गेले आहे. आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. तिथलं जनजीवन विस्कळीत झालं असून महापूर आणि जमिन खचल्याच्या घटना घडल्या आहेत. आसाममध्ये एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार 4 हजार 175 गावातील जवळपास 50 लाख लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरग्रस्तांच्या मदतीला एनडीआरएफची पथके कार्यरत आहेत.पुरग्रस्तांसाठी दिले आपले अर्धे वेतनहिमा दासनं आसाममधील पुरग्रस्तांसाठी तिचं अर्ध वेतन दिलं आहे. याशिवाय पुरग्रस्तांना मदत करा असं आवाहनही केलं आहे. आसाममध्ये पुरस्थिती बिकट असून जवळपास 50 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. यासाठी हिमाने इंडियन ऑईलकडून मिळणाऱ्या वेतनातील अर्धी रक्कम पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत दिली आहे.
भारत देशाचे नाव ऊंच करत पाच सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या हिमादास ला सत्याची वाटचाल न्युज कडून जय हिंद व सलाम.💐
