kshitij parv news
ताज्या

जीवन देणारी कासाडी नदी घडली जीव घेणारी

कासाडी नदीच्या पाण्यामुळे जातोय मुक्या पशुपक्षी प्राण्यांचा जीव पण प्रदूषण नियंत्रणाचे दुर्लक्ष

तळोजा / गोविंद जोशी

पनवेल तालुक्या मधील तलोजा विभागातील वलप पडघे नावडे गावालगत असणारी कासाडी नदी, ही नदी मोठ्या प्रमाणात दूषित झाल्यामुळे त्या कासाडी नदीतील दूषित पाणी पिल्याने पशुपक्षी प्राणी यांना विविध आजार होऊन ते मृत्युमुखी पडत आहेत.
व ही घटना येत्या मार्च महिन्यापासून अनेक ठिकाणी रानावनात पशुपक्षी मृत्युमुखी पडताना दिसत असून त्यावर प्रदूषण नियंत्रण व वन विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. सदर गावालगत व रानात असणारेत छोटे तले-डबके या तळ्यातील पाणी जवळ जवळ मार्च ते एप्रिल महिन्यापर्यंत राहते पण त्यातील अनेक रानातीले तले-डबके मधील पाणी सुखल्याने तेथील असणारे पशुपक्षी प्राणी यांना नाईलाजाने आपल्याला लागलेली तहान कशी भागेल त्या अनुषंगाने वलप ,पाले,पडघे येथे असलेल्या रानातील “पशुपक्षी-प्राणी” कासाडी नदीचा सहारा घेत आपल्याला लागलेली तहान कशी भागेल हा विचार करून कासाडी नदीमध्ये असलेले पाणी पित आहेत. पण त्यांना कुठे माहिती की हे पाणी केमिकलयुक्त असून आपल्या शरीराला धोकादायक आहे,व ते पाणी येथे राहणारे पशुपक्षी पिऊन मृत्युमुखी पडत आहेत त्यामुळे येत्या काही काळात येथे असणारे पशुपक्षी बघायला ही भेटणार नाही…

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की जे घडत आहे ते स्थानिक प्रदूषण नियंत्रण , पनवेल महानगरपालिका, सिडको, यांच्या दुर्लक्षपणामुळे व सहकार्यामुळे कारण जर प्रदूषण नियंत्रणतिल अधिकाऱ्यांनी कारखान्यांवर व प्रदूषण करणाऱ्यांवर योग्य कारवाई केली तर,,,
कासाडी नदीमध्ये येणारे केमिकल युक्त विषारी पाणी जे कारखानदार व सर्विस सेंटर गोडाऊन गावागावातून येणारे गटर चे पाणी याची तपासणी करून सुधारणा केली तर कासाडी नदी येत्या एक वर्षाच्या आत जीव घेणारी नदी जीवदान देणारी घडेल.
व स्थानिक नागरिकांना पाण्याची कमतरता भासणार नाही.
व हे घडून येत आहे त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी स्थानिक कोळी बांधव शेतकरी करत आहेत.

119
Print Friendly, PDF & Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *