पनवेल संपादकीय

पनवेल पोलिसांची उत्तम कामगिरी पळवून नेलेल्या मुलीला दोन दिवसात शोधले.

दिनांक 25/07/2019 रोजी 12.05 वाजता शिलआश्रम नेरे येथील अल्पवयीन मुलगी यशोदा वय 16 वर्ष रा. शिल आश्रम नेरे हीस कोणीतरी इसमाने फुस लावुन पळवुन नेलेबाबत पनवेल शहर पोलीस ठाणे गु.र.नंबर.304/2019 भादवी 363 अन्वये दाखल करण्यात आला होता.

आश्रमातील मुलगी पळवुन नेणे गंभीर बाब असल्यांने शिल आश्रमचे व्यवस्थापक फादर बीजु यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोपेरे यांना संपर्क साधुन शीघ्र तपासास विनंती केली होती.

त्यानुसार त्याची जवाबदारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोपरे यांनी स्वीकारत सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद ढोले यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद ढोले तसेच त्यांची टीम हवलदार साळुंके, पोलीस नाईक परेश म्हात्रे,पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण भोपी दिनांक 27/7/2019 पासुन सदर भागात पाळत ठेवून हिते.

त्या नंतर खास खबरीवरून सदर मुलगी यशोदा ही शेजारील विहीगर गावांत असल्याचे पोलीसांना समजून आले.त्वरित त्यांनी विहिगर गावात जाऊन तपास करत असताना सदर मुलगी  यशोदा ही विहिघर गावातील समुद्रीता(सोनाली)गोपाल शहा यांच्या घरी सुखरूप मिळाली,त्यानंतर पोलिसांनी मुलगी यशोदा ला पनवेल पोलीस स्टेशनला हजर केली.

आश्रमाचे व्यवस्थापक फादरबिजू यांना बोलावून सदर मुलगी यशोदा ला शील आश्रमाचे व्यवस्थापक फादर बिजू यांच्या ताब्यात देण्यात आली आहे. त्यामुळे सदर गुन्हा तत्काल उघडकीस आनला असून घडलेल्या घटनेचा पुढिल तपास पनवेल पो.स्टे. करित आहे.असे पोलीस सहाय्यक निरीक्षक ढोले यांनी सांगितले.

123
Print Friendly, PDF & Email
गोविंद धर्मा जोशी
संपादक : सत्याची वाटचाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *