मुंबई संपादकीय

फिशमिल बंद चा फटका मच्छिमाऱ्यांवर ,हजारो कुटुंब अडचणीत.

देशभरातील फिशमिलवर जीएसटी लावल्याने मिल मालकांनी आपल्या मिल बंद ठेवून विरोध दर्शवला आहे. त्यामुळे मच्छीमारांचा व मिल मध्ये असणाऱ्या हजारो कामगाराचा सर्वात मोठा नुकसान होणार आहे.

कारण…..
बंद असलेल्या होड्या नारलीपोर्णिमा सण साजरा करत दर्याला नारळ अर्पण करून आई एकविरा चे दर्शन घेऊन चांगली मासळी मिळावी व होडीववर असणाऱ्या कोळी बांधवाना ही चांगली दमानी मिळावी असे दर्याला नमन करत समुद्रात आपल्या होड्या सोडण्यात आल्या.

पण सरकारच्या जीएसटी च्या धोरणा मुळे मोठा फटका सरळ मच्छिमारांना बसला आहे.पारंपरिक मच्छीमारांच्या जाळ्यात तब्बल १७ ते १८ दिवसांनी शनिवारी दुपारी खवळा माशांचा बंपर कॅच आला. पण त्याचा आनंद क्षणिकच ठरला. कारण रापण ब्यवसायिक मच्छीमारांनी मत्स्य व्यापाऱ्यांशी संपर्क साधला असता, देशभरातील फिशमिल बंद असल्याचे सांगत मासळी घेण्यास व्यापाऱ्यांनी असमर्थता दर्शविली . यामुळे मच्छीमारांवर मासळी पुन्हा समुद्रात फेकून देण्याची वेळ आली होती,

यावेळी मच्छीमारांनी केंद्र व राज्य शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पारंपरिक रापणकर मच्छीमारांना शनिवारी पाच टनाची सुमारे अडीच लाख रुपये किंमतीची मासळी मिळाली असून मात्र , सदरची मासळी फिशमिलधारक घेत नसल्याने मच्छीमारांना कवडीमोल दराने विकावी लागली .

गणेश चतुर्थी अवघ्या काहा दिवसांवर येऊन ठेपला असताना मासळी मिळूनही आर्थिक नुकसान सोसावे लागल्याने मच्छीमारांनी जीएसटीबाबत तीव्र संताप व्यक्त दर्शवला आहे.

सुरुवात दमदार झाली पण , सुरमई , पापलेट , ढोमा यासारख्या मासळीचे चांगले उत्पन्न मिळत आहे .चांगली मासळी मिळत असल्याने मच्छीमारांमध्ये उत्साहाचे वातावरण कारण येणाऱ्या गणेश चतुर्थीचा सण जवळ आल्याने चांगले आर्थिक उत्पन्न मिळेल , अशी अपेक्षा मच्छीमारांना होती .त्यामुळे त्यांनी फिशमिलधरकांशी संपर्क साधला .मात्र , जीएसटीमुळे फिशमिल बंद ठेवण्यात आल्याने त्यांनी माल खरेदीला नकार दिला असल्याने मच्छीमारांना मोठा धक्का बसला आहे.

विशेष असे की माणिक रापण तसेच बोटीना जी छोटी मासळी मिळते ती फिशमिल खरेदी करतात . व त्याचा किलोमागे चांगला दर मच्छिमारांना दिला जातो.

फिशमिलमधील हजारो कामगार व हजारो मच्छीमार अशी कुटुंब यावर अवलंबून आहेत . फिशमिल बंद असल्याने मिळालेली मासळी पुन्हा समुद्रात फेकून देण्याची वेळ मच्छीमारांवर आली आहे . तसेच रापण व्यवसायात मोठ्या प्रमाणात लहान मासळी मिळत असते .त्यामुळे फिशमिल बंद असल्याने रापण व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे .व हजारो कुटुंब यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे .

यावर सरकार काय भूमिका घेते याकडे मच्छिमार व कामगार अशा लावून बसले आहेत.

48
Print Friendly, PDF & Email
गोविंद धर्मा जोशी
संपादक : सत्याची वाटचाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *