मुंबई संपादकीय

नवीन मोटार परिवहन कायद्याला राज्यात तूर्तास स्थगिती,अती दंड अकारल्यास चालक कोर्टात जाऊ शकतात; रावते

मुंबईः

केंद्र सरकारनं राबवलेल्या मोटार वाहन कायद्याला राज्यात तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली आहे. मोटार वाहन कायद्यासंदर्भात केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यानुसार नवीन मोटार वाहन कायद्याला राज्यात तूर्तास स्थगिती दिल्याचं दिवाकर रावतेंनी जाहीर केलं आहे.

या कायद्यासंदर्भात राज्यानं कोणतीही भूमिका घेतलेली नाही. या कायद्याच्या बाबतीत राज्य सरकार तटस्थ आहे. यासंदर्भामध्ये आम्ही जोपर्यंत नोटिफिकेशन काढत नाही, तोपर्यंत या कायद्याची राज्यात अंमलबजावणी होणार नाही. तरीही अशा प्रकारे कोणी दंडवसुली करत असल्यास वाहन चालक कोर्टात जाऊ शकतात, असं रावतेंनी सांगितलं आहे.

सध्या महाराष्ट्रात जुन्या आरटीओ नियमाप्रमाणेच दंडवसुली केली जाणार आहे. राज्यात हा कायदा लागू करण्याबाबत सरकारनं तटस्थतेची भूमिका घेतली आहे. दंडाचा फेरविचार करण्यासाठी दिवाकर रावतेंनी नितीन गडकरींना पत्र लिहिलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नव्या मोटार वाहन कायद्याला स्थगिती मिळातांना दिसत आहे.

तर दुसरीकडे गुजरात सरकारने मोटार वाहन कायद्यात बदल करत या नियमातील दंडांची रक्कम कमी केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मंगळवारी मोटार वाहन कायद्यात बदल करण्यात येत असल्याची माहिती दिली. या नवीन बदलानुसार दंडाची रक्कम 50 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे.

मात्र, केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकारने या नियमात बदल करणे योग्य नसल्याचं म्हटलं होतं.

75
Print Friendly, PDF & Email
गोविंद धर्मा जोशी
संपादक : सत्याची वाटचाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *