तळोजा पनवेल संपादकीय

पनवेल येथील होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेपासून दोन ते तीन किलोमीटर वरील गावात लोकांच्या जीवाशी खेळ.

पापडीचा पाडा च्या नागरिकांच्या जीवाशी खेळ, महानगरपालिका च्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष.

पनवेल तालुक्यातील महानगरपालिका क्षेत्रातील पापडीचा पाडा गावात अनेक दिवसापासून असणारा शौचालय याची अवस्था खराब झाली असून, त्यातील  मळ मिश्रित पाणी रस्त्यावर येत असल्याने त्याचा येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, पण अनेक वेळेला याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना दिली असतानाही अधिकारी दुर्लक्ष करत आहेत,

तसेच शौचालयास जाताना नागरिकांना आपल्या तोंडाला फडके बांधून जावे लागत आहे,

 

त्यामुळे पनवेल महानगरपालिकेचा कारोबार पुन्हा लोकांसमोर आला आहे.

या दुर्गंधीमुळे येथील नागरिकांना व लहान मुलांना मोठा त्रास होत असून त्यांना आजाराला सामोरे जावे लागत आहे,

पण उद्या कुठली घटना घडू नये यासाठी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी याकडे लक्ष देऊन आम्हाला सहकार्य करावे,असे गावकरी म्हणत आहेत तसेच अधिकारी का लक्ष देत नाही याची पहाणी ही करावी व अशा अधिकाऱ्यांन मुळे आम्हाला जो तीन महिण्यापासून त्रास सहन करावा लागत आहे त्याच्या बद्दल या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.

नाहीतर उद्या कुठली दुर्घटना घडली तर त्याला पूर्ण जबाबदार पनवेल महानगरपालिका व अधीकारी असतील असे पापडीचा पाडा गावकऱ्यांनी सांगितले आहे.

228
Print Friendly, PDF & Email
गोविंद धर्मा जोशी
संपादक : सत्याची वाटचाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *