पनवेल

पनवेल महानगरपालिकेची अनधिकृत आठवडी बाजारांवर कारवाई

 रोडपाली व खांदा काॅलनीत भरणारे आठवडी बाजार उधळून लावले. शेकडो बाहेरून येणारे व्यापारी/विक्रेते यांनी पथकांना पाहताच पळ काढला.

 बाहेरून विक्रेते येऊन शहरात विक्री करतात. याचा त्रास येथील स्थानिक व्यापारी व विक्रेते यांना होतोच शिवाय यामुळे वाहतुकीस अडथळा ही निर्माण होतो. तसेच कचरा होणे, बाजारात खिसे कापणे, सोनसाखळी व मोबाईल, पाकिटमारी होणे हे नित्याचे झाले होते.

आता अशा अनधिकृत बाजाराला महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने लक्ष केले असून ही कारवाई सातत्याने करण्यात येणार आहे,

या आधी कारवाई का होत नव्हती का ? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. परंतु लोकसभा निवडणुका व मधे पावसाळा नंतर विधानसभा निवडणुका यात सर्व व्यस्त असल्याचा गैरफायदा घेऊन अवैध व्यावसायिक पुन्हा आपला हातपाय पसरू लागले होते. मात्र आता त्यांची काही डाळ शिजणार नाही अशी कारवाई होत आहे. यात कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही.

आयुक्त गणेश देशमुख यांनी दिपावली सुट्ट्या नंतर निवडणूक कामकाजातून मोकळा झालेला स्टाफ आता सक्रीय केला असून संथ झालेली कामे गतिमान केलेली आहेत. अनेकजण या शिथिलतेचा गैरफायदा घेऊन अनधिकृत व्यवसाय करत होते व त्यांचे रक्षक आता हवालदिल झाल्याचे मागिल तीन दिवसात दिसू लागले आहे. ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे. पुढचे सर्व आठवडे बाजार कारवाई करून बंद केले जाणार आहेत.

*उपआयुक्त जमीर लेंग्रेकर * पनवेल महानगरपालिका अतिक्रमण विभागाने कोणतेही सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण सहन केले जाणार नाही याचा कडक संदेश दिला आहे. सामान्य नागरिकांना अतिक्रमणाचा त्रास होऊ नये यासाठी आता महानगरपालिकेने कडक भूमिका स्विकारली आहे.

154
Print Friendly, PDF & Email
गोविंद धर्मा जोशी
संपादक : सत्याची वाटचाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *