तळोजा नवी मुंबई पनवेल रायगड संपादकीय

तळोजा पोलिसांची ची धडक कारवाई , ट्रेलर ट्रॉली चोरणारी टोळी अटकेत.

तळोजा पोलीसांकडुन तळोजा , उरण , पनवेल , कामोठे , हिल लाईन भागातुन ट्रेलर ट्रॉली चोरणारी टोळी अटकेत , एकुण १५ ट्रॉली व एकुण ५९ ,00,000 / रुपयांचा माल हस्तगत

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परि . २ , पनवेल मध्ये गेल्या आठ ते दहा महिण्यापासन ट्रकच्या ट्रॉली चोरीस जाण्याच्या प्रमाणात वाढ झाली होती . त्यामध्ये तळोजा , उरण , न्हावाशेवा , कामोठे भागातून ट्रकच्या ट्रॉली चोरीस गेल्या होत्या

. तसेच दिनांक १२ / ११ / २०१९ रोजी तळोजा पोलीस ठाणे हद्दीतुन एक ट्रेलर ट्रॉली चोरीस ही गेली होती . सदर बाब तळोजा पोलीस ठाणेत गु . र . नं . २१४ / २०१९ भादवि ३७९ प्रमाणे दाखल आहे .

सदर गुन्ह्या बाबत श्री .अशोक दुधे , पोलीस उपआयुक्त परि . २ पनवेल , श्री . रविंद्र गिड्डे , सहा .पोलीस आयुक्त – पनवेल विभाग व .श्री विठ्ठल दामुगडे सहा -पोलीस आयुक्त , यांच्या सूचनेनुसार.

तळोजा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण- यांनी एक पथक स्थापन करून त्या पथकाची चोरांवर कडक नजर होती. काही दिवसातच सदर पथकाने पोलीस ठाणे हद्दीतील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून गुन्हयाचा तांत्रीक तपास करून खालील आरोपींना मुंबई भागातुन दि . १४ / ११ / २०१९ रोजी अटक केली आहे.

आरोपीकडे तपास पथकाने सखोल तपास करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाणेमधील ट्रेलर ट्रॉली चोरीचे गुन्हे उघडकीस आणून चोरीस गेलेल्या ट्रेलर ट्रॉली तसेच ट्रॉली चोरी करण्यासाठी वापरात असलेला घोडा ( ट्रक इंजिन ) बई , नवी मुंबई भागातुन हस्तगत केला आहे .

त्याच प्रमाणे अटक आरोपींकडुन एकुण ४ ट्रेलर ट्रॉली एकुण किंमत ९ ,00 ,000 लाख रूपये तसेच इतर ठिकाणावरून चोरी केलेल्या ट्रॉली जप्त करण्यात आल्या असुन त्याबाबत तपास पथक अधिक तपास करीत आहे .

अटक आरोपींना मा . न्यायालयात हजर केले असता त्यांना आज दि . १८ / ११ / २०१९ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळाली आहे .

चोरांना गजाआड पाठवणारे शिलेदार

तळोजा वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण, पोलीस निरीक्षक(गुन्हे).राजू अडागळे , सहा .पोलीस निरीक्षक सुधीर निकम , पोउपनि. सतिश घुगे , पो हवा – ११७७ थोरात , पोहवा – २१४४ शिंदे , पोहवा -१३५० पाटील , पोहवा – १२१७ चौगुले , पोना / २०९८ सचिन पवार , पोना -२२९५ उमेश पाटील , पोना – ९३ शिंदे , पोना – १२१८ महेंद्र होणवार , पोना – २८३३ सचिन टिके , पोना -२३४९ मयूर सोनवणे , पोना – ४२७ पाटील , पोना – २९९३ संतोष राठोड , पोना / २८०९ खेडकर , पोशि – १२११६ अनिल जाधव यांनी केली असुन पुढील तपास चालु आहे .

856
Print Friendly, PDF & Email
गोविंद धर्मा जोशी
संपादक : सत्याची वाटचाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *